शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

नागभीडमध्ये 56 शेतकऱ्यांची कर्ज प्रकरणे अद्यापही प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2020 05:00 IST

मिळालेल्या माहितीनुसार, तहसीलदार नागभीड यांच्याकडे एकूण १९ प्रकरणे प्रलंबित असल्याची माहिती आहे. यात जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नागभीड शाखेतील एक, तळोधी शाखेत १०, पाहार्णी दोन, नवेगाव पांडव शाखेत एक तर स्टेट बँक तळोधी शाखेतील पाच प्रकरणांचा यात समावेश आहे. जिल्हाधिकारी यांच्याकडे ३७ प्रकरणे प्रलंबित असल्याची माहिती आहे. प्रलंबित असलेल्या या प्रकरणात जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नागभीड, नवेगाव पांडव, पाहार्णी, शाखेतील प्रत्येकी एक तर तळोधी शाखेतील दोन प्रकरणांचा समावेश आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांमध्ये संताप : महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना

  घनश्याम नवघडे    लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड :  नागभीड तालुक्यात महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील ५६ शेतकऱ्यांची कर्ज प्रकरणे अद्यापही प्रलंबित आहेत.सर्व शेतकरी सभासदांना महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळावा, यासाठी प्रशासन कसोशीचे प्रयत्न करीत असले तरी शेतकरी सभासदांकडूनच प्रतिसाद मिळत नसल्याने वर्षभरानंतरही तालुक्यात ५६ शेतकरी सभासदांची कर्जप्रकरणे प्रलंबित आहेत. या सभासदांनी किंवा सभासदांच्या वारसांनी संबंधित विभागाशी संपर्क साधून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली तर या सभासदांच्या खात्यावर रक्कम जमा होण्यास कोणतीही अडचण नाही, अशी सुत्राची माहिती आहे.मिळालेल्या माहितीनुसार, तहसीलदार नागभीड यांच्याकडे एकूण १९ प्रकरणे प्रलंबित असल्याची माहिती आहे. यात जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नागभीड शाखेतील एक, तळोधी शाखेत १०, पाहार्णी दोन, नवेगाव पांडव शाखेत एक तर स्टेट बँक तळोधी शाखेतील पाच प्रकरणांचा यात समावेश आहे.जिल्हाधिकारी यांच्याकडे ३७ प्रकरणे प्रलंबित असल्याची माहिती आहे. प्रलंबित असलेल्या या प्रकरणात जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नागभीड, नवेगाव पांडव, पाहार्णी, शाखेतील प्रत्येकी एक तर तळोधी शाखेतील दोन प्रकरणांचा समावेश आहे. स्टेट बँकेच्या तळोधी शाखेतील २६, वाढोणा शाखेतील एक तर बाळापूर शाखेत तीन प्रकरणांचा समावेश आहे. ग्रामीण बँकेच्या तळोधी आणि मोहाळी येथीलही प्रत्येकी एका प्रकरणाचा समावेश आहे. 

५ हजार ३७५ शेतकऱ्यांना लाभनागभीड तालुक्यात सहा हजार ३० शेतकºयांचे खाते अपलोड करण्यात आले होते. त्यापैकी पाच हजार ३७५ शेतकºयांना कर्जमुक्तीचा लाभ मिळाला असून रक्कम २२ कोटी ३ लाख रुपये आहे.

जे कर्जदार सभासद मय्यत आहेत, पण कर्जमुक्तीसाठी पात्र आहेत. त्या सभासदांच्या वारसांनी सभासदाचा मृत्यू दाखला,आधार कार्ड, वारसान प्रमाणपत्र, वारसानाचे आधार कार्ड व बँक पासबूक आदी कागदपत्रासह सहायक निबंधक कार्यालयाशी संपर्क करावा.- पी. एन. गौरकार, सहकार अधिकारी.

टॅग्स :FarmerशेतकरीCrop Loanपीक कर्ज