सावली : माझी वसुंधरा मोहिमेंतर्गत स्वच्छता जनजागृतीसाठी नगरपंचायततर्फे शहरातील मुख्य मार्गाने जनजागृती रॅली काढण्यात आली. रॅलीला मुख्याधिकारी मनिषा वजाळे यांनी हिरवी झेंडी दाखवली. रॅलीमध्ये युवक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.
पर्यावरणाच्या रक्षणासाठी राज्यात माझी वसुंधरा मोहीम राबविण्यात येत आहे. १ जानेवारीपासून सावली नगरपंचायतर्फे या मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे. मुख्याधिकारी मनिषा वजाळे यांनी शहरातील युवकांना स्वच्छता अभियानात सहभागी होण्याचे आवाहन करून स्वत: हातात झाडू घेऊन स्वच्छता केली. त्यामुळे या मोहिमेत शहरातील युवक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले आहेत. दररोज एक तास श्रमदान करण्याचा निर्णय घेऊन शहरात स्वच्छता करीत आहेत. त्याअनुषंगाने जनजागृती करण्याच्या उद्देशाने रविवारी सकाळी शहरातील मुख्य मार्गाने जनजागृती सायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये मुख्याधिकारी मनिषा वजाळे, नगर पंचायतचे सर्व कर्मचारी तसेच शहरातील युवक अंतबोध बोरकर, प्रफुल्ल बोरकर, पुष्पकांत डोंगरे, प्रद्युत डोहणे, बादल खोब्रागडे, साहील वासाडे, मृणाल गोंलकोंडावार, चिन्मय दुधे, प्रफुल्ल गोंगले, श्रीकांत खोब्रागडे, रोहित बोरकर, मनीष वनकर, नितेश बोरकर, गब्बर दुधे यांच्यासह अनेक युवक सहभागी झाले होते.