शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे मूक आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 23:26 IST

जागतिक महिला दिनी सर्वत्र महिलांचा सन्मान व गौरव करण्यात येतो. मात्र त्याच महिलांच्या सुरक्षेकडे भाजप सरकारचे दुर्लक्ष होत आहे. परिणामी राज्यातच नव्हे, तर संपूर्ण देशात महिलांवरील अत्याचारात वाढ होत आहे.

ठळक मुद्देसरकारविरोधी निदर्शने : महिलांवरील अत्याचाराच्या घटनेत वाढ

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : जागतिक महिला दिनी सर्वत्र महिलांचा सन्मान व गौरव करण्यात येतो. मात्र त्याच महिलांच्या सुरक्षेकडे भाजप सरकारचे दुर्लक्ष होत आहे. परिणामी राज्यातच नव्हे, तर संपूर्ण देशात महिलांवरील अत्याचारात वाढ होत आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्हा व शहर राष्ट्रवादी महिला काँगेसच्या वतीने प्रियदर्शिनी इंदिरा गांधी यांच्या पुतळ्यासमोर महिला जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी मूक आंदोलन करण्यात आले.दिवसेंदिवस महिलांवरील बलात्कार, अ‍ॅसिड हल्ले, खून, मारहाण, छेडखानी या घटनेमध्ये वाढ होत आहे. दररोज महिला यासारख्या घटनेला सामोर जात आहेत. कायद्याचा कोणालाही धाक राहिला नसून कायद्याची अंमलबजावणी योग्य होताना दिसत नाही. परिणामी भाजप सरकारच्या काळात कायदा व सुव्यवस्था धोक्यात आलेली दिसून येत आहे. त्यामुळे महिला व मुलींना एकटे बाहेर पडण्यास भीती निर्माण झाली आहे. यासाठी शासनाकडून कठोर पावले उचलण्याची गरज असताना भाजप सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिलांकडून भाजप सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी ‘बडते जाते महिलाओंपे अत्याचार कहाँ गये फडणवीस सरकार’, ‘लगातार बलात्कार फडणवीस सरकार गुन्हेगार’, ‘हमे चाहिये सुरक्षा, हिंसा नहीं सन्मान’, असा मजकूर लिहलेले फलक दाखवून निषेध करण्यात आला. यावेळी माजी नगराध्यक्ष दीपक जयस्वाल, महिला जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके, शहराध्यक्ष ज्योती रंगारी, ज्येष्ठ नेते डी. के. आरिकर, सुनील काले, हेमलता पाजनकर, जिल्हा उपाध्यक्ष वंदना आवले, जिल्हा सचिव सबीहा देवगळे, नगरसेविका मंगला आखरे तालुकाध्यक्ष मनीषा काकडे, सुनीता नरडे, सुषमा राऊत, दयाबाई गोवर्धन, उपाध्यक्ष चांदनी राजुरकर, पूजा पडोळे, सरस्वती गावंडे, सुचिता बोरकर, सुमित्रा वैद्य, निर्मला नरवडे, शर्मिला बिश्वास, लता जांभुळकर, सोनाली चरडुके यांचा सहभाग होता.