निलेश ताजणे यांची माहिती : विविध विकास कामेगडचांदूर : गडचांदूर शहराच्या सर्वांगिण विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व नगर पालिका प्रशासन कटीबद्ध असल्याची माहिती नगर परिषदमधील विरोधी पक्षाचे गटनेते निलेश ताजणे यांनी दिली.नगर परिषद क्षेत्रात सध्या करोडो रुपयाची विकास कामे सुरू असून ही विकास कामे दर्जेदार व्हावी, निकृष्ठ दर्जाचे साहित्य वापरु नये, याकडे काटेकोरपणे लक्ष दिले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणत्याही नगरसेवकाने ठेकेदाराकडे पैशाची मागणी केली नाही, असे निलेश ताजणे यांनी म्हटले आहे. साई शांतीनगर व मेश्राम नगर येथील रस्ता खडीकरण, सिमेंट क्राँक्रीट रस्त्याच्या कामात ठेकेदारानी निकृष्ठ साहित्याचा वापर करून शासनाची दिशाभूल केली. त्याची रितसर तक्रार मुख्याधिकारी व जिल्हाधिकारी यांच्याकडे करुन संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी राकाँचे शहर अध्यक्ष अरविंद डोहे यांनी केली आहे. तहसीलदार कोरपना यांनी ३ जूनला मुख्याधिकारी यांना पत्र देऊन शहरात सुरू असलेल्या रोडच्या कामात अवैध उत्खनन करून शासनाचे नुकसान होत असल्याने संपूर्ण प्रकरणाची चौक शी करण्याचे आदेश दिले आहे. (वार्ताहर)
गडचांदूरच्या विकासासाठी नगर पालिका कटिबद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2016 00:47 IST