शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूरमध्ये महापालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांनी जाणून घेतले आनंदी जीवनाचे रहस्य

By साईनाथ कुचनकार | Updated: May 10, 2023 17:39 IST

सांस्कृतिक मंत्रालयाने हर घर ध्यान अभियानद्वारे एक सकारात्मक पाऊल उचलले आहे.

चंद्रपूर : महानगरपालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर कामाचा मोठा ताण असतो. तणावाचा केवळ मानसिक आरोग्यावर परिणाम होत नाही तर शारीरिक आरोग्यावरही परिणाम होतो. हा ताण कमी करण्यासाठी चंद्रपूर महानगरपालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी आयुक्त विपीन पालिवाल यांच्या मार्गदर्शनात आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून आनंदी जीवनाचे रहस्य जाणून घेतले.

सांस्कृतिक मंत्रालयाने हर घर ध्यान अभियानद्वारे एक सकारात्मक पाऊल उचलले आहे. आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून हर घर ध्यान अभियान १५ ऑगस्ट २०२३ पर्यंत देशभरात चालविले जाणार आहे. त्याअंतर्गत चंद्रपूर महानगरपालिकेत ध्यान शिबिर घेण्यात आले. शिबिराच्या माध्यमातून अधिकारी, कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. मुग्धा तरुण खांडे यांच्या पुढाकारातून योगिता वानखेडे, रवींद्र लाखे, वृंदा लाखे, प्रीती संघवी, स्वाती बच्चूवार या आर्ट ऑफ लिव्हिंगच्या चमूने मनपा अधिकारी-कर्मचाऱ्यांना तणाव व्यवस्थापन व आनंदी जीवनाचे रहस्य याबद्दल मार्गदर्शन केले. यावेळी कर्मचाऱ्यांसाठी आनंदी राहण्याचे तंत्र व तणाव मापन चाचणी घेण्यात आली.

आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल यांनी सर्वांनी निरोगी आयुष्य जगण्याच्या दृष्टीने व्यायाम तसेच योग व ध्यान करण्याचा सल्ला दिला. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, उपायुक्त अशोक गराटे, शहर अभियंता महेश बारई, मुख्य लेखाधिकारी मनोहर बागडे, सहायक संचालक नगररचना सुनील दहीकर, उपअभियंता विजय बोरीकर, अनिल घुमडे तसेच मनपा अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर