शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
2
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
3
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
4
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
5
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
6
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
7
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
8
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
9
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
10
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
11
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
12
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
13
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
14
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
15
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
16
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
17
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
18
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
19
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
20
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?

प्राचीन विहीर स्वच्छतेसाठी मनपाचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 22:43 IST

इको-प्रोद्वारा सुरु असलेल्या शहरातील गोंडकालीन ऐतिहासिक बावडी-विहिरी स्वच्छता अभियानास मंगळवारी शहर महानगरपालिकेचे आयुक्त संजय काकडे यांनी भेट दिली. तसेच विहिरी स्वछतेसाठी इको-प्रो सोबत मनपासुद्धा पुढाकार घेणार असल्याचे घोषणा करीत संबधित अधिकाऱ्यांना तशा सूचना दिल्या.

ठळक मुद्देआयुक्तांची घोषणा : गोंडकालीन विहीर स्वच्छता अभियानाला भेट

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : इको-प्रोद्वारा सुरु असलेल्या शहरातील गोंडकालीन ऐतिहासिक बावडी-विहिरी स्वच्छता अभियानास मंगळवारी शहर महानगरपालिकेचे आयुक्त संजय काकडे यांनी भेट दिली. तसेच विहिरी स्वछतेसाठी इको-प्रो सोबत मनपासुद्धा पुढाकार घेणार असल्याचे घोषणा करीत संबधित अधिकाऱ्यांना तशा सूचना दिल्या.इको-प्रोच्या ऐतिहासिक गोंडकालीन बावडी-विहिरी स्वच्छता अभियानाची पाहणी करण्यास आयुक्त संजय काकडे, उपायुक्त विजय देवळीकर यांनी बाबुपेठ येथील अभियान स्थळी विहिरीला भेट दिली. यासोबत हिंग्लाज भवानी मंदिर परिसरातील पायऱ्याच्या विहिरीची पाहणी केली. यावेळी या ऐतिहासिक विहिरीची आणि सुरु असलेल्या अभियानाची माहिती संस्थेचे अध्यक्ष बंडू धोतरे यानी दिली.महात्मा गांधीच्या १५० व्या जयंती निमित्त देशात सुरु असलेल्या ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान अंतर्गत इको-प्रो संस्थेने दुर्लक्षित असलेल्या शहरातील गोंडकालीन ऐतिहासिक बावडी-विहिरीची स्वच्छता करण्याचे अभियान १५ सप्टेंबरपासून सुरु केले होते. या अभियान अंतर्गत बाबुपेठ परिसरातील जवळपास ६० फुट अधिक खोल असणारी, तीन मजली पायºयाची विहिरीपासून सुरुवात करण्यात आली. सदर विहिर दुर्लक्षित असल्याने कचरा फेकण्याचे ठिकाण झाले होते. यावर मोठी-मोठी झाड़े उगवल्याने विहिरीची तुटफुट झाली होती. या अभियानामुळे आता या विहिरीची स्वच्छता आणि संवर्धनाची शक्यता वाढली आहे. तसेच या अभियानात आता पुढे महानगरपालिका पूर्णपणे सहभागी होणार असल्याने ऐतिहासिक विहिरीचे संवर्धनासोबत, जलस्त्रोत संवर्धन आणि स्वच्छता अभियानाच्या दृष्टीने महानगरपालिकेचा पुढाकार अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे, असे मत इको-प्रोचे अध्यक्ष बंडू धोतरे यांनी व्यक्त केले.यावेळी आयुक्त काकडे यांना सदर विहिरी स्वच्छ केल्यानंतर येथे नागरिकांना पाणीपुरवठा व्यवस्था करण्याची, तसेच विहिरीला लोखंडी जाळी लावण्याची मागणी करण्यात आली.अभियानस्थळी संस्थेचे अध्यक्ष बंडू धोतरे, इको-प्रो पुरातत्व विभाग प्रमुख रवी गुरनुले, नितीन बुरडकर, बिमल शहा, अनील अदूरवार, राजू कहीलकर, कपिल चौधरी, प्रमोद मलिक, राजेश व्यास, सुनील पाटिल, मनीष गावंडे, अमोल उत्तलवार, पूजा गहुकर, आयुषी मुल्लेवार, सारिका वाकुडकर यांच्यासह इको-प्रोचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.पर्यटनास वाव मिळेलमहानगरपालिका आयुक्त संजय काकडे यांना इको-प्रोचे बंडू धोतरे यांनी निवेदन देत अभियानाची पाहणी करण्याची विनंती केली होती. त्यानुसार मंगळवारी आयुक्त काकडे यांनी बाबुपेठ परिसरातील अभियानस्थळी भेट देत पाहणी केली. सदर विहिरी गोेंडकालीन जलस्त्रोतच नाही, तर स्थापत्यकलेचा उत्तम नमुना असून पर्यटनदृष्ट्रया महत्वचा ठरणार आहे. शहरात अनेक ऐतिहासिक वारसा असून तो जपला जाणे गरजेचे आहे. तसेच जलस्त्रोताचे संवर्धन होणे गरजेचे आहे असे मत आयुक्त संजय काकडे यांनी व्यक्त केले. मागील अनेक दिवसांपासून इको- प्रोने शहरातील ऐतिहासिक वस्तूची स्वच्छता मोहिम सुरु केली आहे. याबाबतबची दखल पंतप्रधानानी घेतली. त्यामुळे चंद्रपूरचे नाव सर्वत्र प्रचलीत झाले. परिणामी शहरातील पर्यटनाला वाव मिळेल, असे ते म्हणाले. तसेच अभियानात सहभागी सदस्यांचे त्यांनी कौतुक केले.