शहरं
Join us  
Trending Stories
1
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
2
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
3
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
4
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
5
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
6
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
7
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
8
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
9
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
10
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
11
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

पालिकेकडे पाणी पुरवठ्याचे २८ लाख रूपये थकीत

By admin | Updated: March 30, 2017 00:45 IST

तपाळ पाणी पुरवठा योजनेचे संचालन करणाऱ्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे नागभीड नगर परिषदेकडून २८ लाख १६ हजार ६४० रुपये घेणे आहेत.

नागभीड, नवखळा, चिखलपरसोडी गावांचा समावेश : उन्हाळ्यात पाणी पुरवठा होणार प्रभावितनागभीड : तपाळ पाणी पुरवठा योजनेचे संचालन करणाऱ्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे नागभीड नगर परिषदेकडून २८ लाख १६ हजार ६४० रुपये घेणे आहेत. मात्र नगर परिषद हे पाणीकर वेळेवर अदा करीत नसल्याने पाणीपुरवठा विभागासमोरील अडचणी वाढल्या आहेत.तपाळ पाणी पुरवठा योजनेमार्फत ब्रह्मपुरी तालुक्यातील तोरगाव (बुज) बोरगाव (खुर्द) तपाळ या ब्रह्मपुरी तालुक्यातील तर नागभीड, नवखळा, मोशी, चिखलपरसोडी, चिकमारा, देवटक, ढोरपा या नागभीड तालुक्यातील गावांना पाणी पुरवठा करण्यात येतो. या योजनेतील काही गावांची पाणी करवसुली समाधानकारक असली तरी नागभीड नगर परिषदेत अंतर्भूत असलेल्या नागभीड, नवखळा आणि चिखलपरसोडी या गावांनी पाणीकर वसुलीबाबत पाणी पुरवठा विभागाला चांगलाच ठेंगा दाखविला आहे.तपाळ पाणी पुरवठा योजनेचे नागभीडमध्ये ७१० कनेक्शन आहेत. नवखळामध्ये २०७ तर चिखलपरसोडीमध्ये ४७ नळकनेक्शन आहेत. एका कनेक्शनचा वर्षभराचा दर ७१० रुपये आहे. २०१६-१७ या आर्थिक वर्षातील नागभीडकडे पाच लाख ५८ हजार १४४ रुपये तर यावर्षीची ४ लाख ८ हजार ९६० रूपये असे एकूण ९ लाख ६७ हजार १०४ रुपये, नवखळ्याकडे २०१५-१६ या आर्थिक वर्षातील १ लाख ६३ हजार २९६ रुपये, २०१६-१७ या वर्षातील १ लाख १९ हजार २३२ रुपये असे एकूण दोन लाख ८२ हजार ५२८ रुपये पाणीपुरवठा विभागाला घेणे आहेत. चिखलपरसोडीकडे २०१५-१६ या वर्षातील ३७ हजार १५२ रुपये तर २०१६-१७ या वर्षातील २७ हजार ७२ रुपये थकीत आहेत.नागभीड नगर परिषदेअंतर्गत असलेल्या या तिन्ही गावाकडे २०१५-१६ या वर्षातील १३ लाख ४३ हजार ५२० रुपये तर २०१६-१७ या वर्षाचे पाच लाख ५५ हजार २६४ रुपये थकीत आहेत. या वसुलीबाबत पाणी पुरवठा विभागाने नागभीड नगर परिषदेला अनेकदा अवगत केले, असे पाणी पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र नगर परिषदेकडून नेहमीच थंड प्रतिसाद असतो, असेही या अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला सांगितले. या प्रकारामुळे पाणीपुरवठा योजनेच्या डागडुजी करण्याच्या कामासाठी अडचणी येत असल्याचे अधिकाऱ्यांने सांगितले. त्यामुळे भविष्यात अडचणी उद्भवल्यास त्रास सहन करावा लागणार आहे. (तालुका प्रतिनिधी)दोन लाख रुपये नुकतेच अदा करण्यात आले आहेत. पाणी पुरवठा विभागाकडून आलेल्या मागणीचा ताळमेळ जुळविण्यात येईल व पाणीकर वसुल झाल्यानंतर आणखी रक्कम अदा करण्यात येईल.- मंगेश खवले, मुख्याधिकारीन.प. नागभीड.