लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी महात्मा जोतिबा फुले यांच्या साथीने उपेक्षितांच्या जीवनात आनंदाचा प्रकाश निर्माण केला. पुण्यातील ज्या भिडेवाड्यात सावित्रीबार्इंनी मुलींची पहिली शाळा सुरू करून स्त्री शिक्षणाची मुहुर्तमेढ रोवली. त्या भिडेवाड्याच्या नुतनीकरणासाठी निधी व सावित्रीबार्इंच्या वारसांना नोकरी, पुणे विद्यापीठाला सावित्रीबार्इंचे फुले यांचे नाव मिळवून दिले. फुले दाम्पत्याला मरणोत्तर भारतरत्न या सर्वोच्च उपाधीने सन्मानित करण्यासाठी लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे माजी अर्थमंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले. मूल तालुक्यातील मारोडा येथे महात्मा जोतिबा व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळयांचे शुक्रवारी अनावरण करताना ते बोलत होते.यावेळी माळी महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष अरूण तिखे, चंद्रपूर माळी महासंघाचे शहर अध्यक्ष निलेश खरबडे, मूल पंचायत समितीचे सभापती चंदू मारगोनवार, उपसभापती घनश्याम जुमनाके, डॉ. संजय घाटे, विजय चहारे, राजेंद्र गांधी, प्रवीण पडवेकर, अशोक पुल्लावार, सचिन गुरनुले, शरद चहारे, नयना चहारे, पुजा डोहणे आदींची उपस्थिती होती. आमदार मुनगंटीवार पुढे म्हणाले, सावित्रीबार्इंनी आपले अवघे आयुष्य मुलींच्या शिक्षणासाठी खर्ची घातले. त्यामुळे त्यांचा हा वसा पुढे नेण्याची जबाबदारी आपली आहे. कार्यक्रमाला विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. विद्यार्थी व विद्यार्थिनींनी लेझीमद्वारे मान्यवरांचे स्वागत केले.मुलगी वंशाचा दिवामूल शहरात माळी समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाचे बांधकाम पूर्ण केले. पोंभुर्णा शहरातही मुलींच्या वसतिगृह बांधकामासाठी ७५ लाखांचा निधी मंजूर केला. मुलगी ही वंशाचा दिवा असतो. हा दिवा अधिक उजळावा, यासाठी आपण साऱ्यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. पुण्यातील भिडेवाडा हे मुलींच्या शिक्षणाचे एक अद्वितीय केंद्र आहे. त्यासाठी निधी कमी पडणार नाही, यादृष्टीने आपली संघर्षाची तयार असल्याचेही आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले.
फुले दाम्पत्याला ‘भारतरत्न’साठी पाठपुरावा करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2020 06:00 IST
फुले दाम्पत्याला मरणोत्तर भारतरत्न या सर्वोच्च उपाधीने सन्मानित करण्यासाठी लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे माजी अर्थमंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले. मूल तालुक्यातील मारोडा येथे महात्मा जोतिबा व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळयांचे शुक्रवारी अनावरण करताना ते बोलत होते.
फुले दाम्पत्याला ‘भारतरत्न’साठी पाठपुरावा करणार
ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : मारोडा येथे महात्मा जोतिबा व सावित्रीबाई फुले पुतळयांचे अनावरण