शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

विजुक्टाचे जि.प.समोर आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 01:19 IST

शिक्षण आणि शिक्षकांच्या न्याय मागण्यांसाठी शिक्षकांच्या विजुक्ट संघटनेने अनेक आंदोलने केली. मात्र शासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने शुक्रवारी संघटनेतर्फे राज्यव्यापी जेलभरो आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देशिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन : प्रलंबित मागण्या सोडवा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शिक्षण आणि शिक्षकांच्या न्याय मागण्यांसाठी शिक्षकांच्या विजुक्ट संघटनेने अनेक आंदोलने केली. मात्र शासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने शुक्रवारी संघटनेतर्फे राज्यव्यापी जेलभरो आंदोलन करण्यात आले. जिल्हा संघटनेतर्फेही जिल्हा परिषदेसमोर आंदोलन करून शिक्षणाधिकाºयांना मागण्यांचे निवेदन दिले.विविध मागण्यांसाठी संघटनेतर्फे ५ सप्टेंबरला काळा दिवस पाळण्यात आला. ११ आॅक्टोबरला सर्व जिल्ह्यात शिक्षणाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन केले. २८ नोव्हेंबरला विभागीय मोर्चे काढण्यात आले. तर ८ डिसेंबरला तालुका पातळीवर धरणे आंदोलने, १८ जानेवारीला शिक्षण उपसंचालक नागपूर येथे मोर्चा व निवेदन सादर केले. परंतु शासनाकडून याबाबत सकारात्मक पाऊल उचलल्या गेले नाही. त्यामुळे जेलभरो आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात संघटनेचे असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते.शासनाने शिक्षण, विद्यार्थी व शिक्षकाप्रती संवेदनशील होऊन घेतलेल्या निर्णयाची सकारात्मक अंमलबजावणी करावी, या हेतूने शुक्रवारला संपूर्ण राज्यभर कनिष्ठ महाविद्यालयांच्या बंदच्या पार्श्वभूमीवर शिक्षणाधिकारी कार्यालय येथे जेलभरो आंदोलन करण्यात आले.यावेळी १ नोव्हेंबर २००५ पूर्वी अंशत: अनुदानावर असलेल्या व त्यानंतर सेवेत आलेल्या सर्व शिक्षकांना जुनी पेंशन योजना लागू करावी, कायम विना अनुदानीत तत्वावरील मुल्याकनास पात्र कनिष्ठ महाविद्यालयाची यादी घोषित करून त्याला त्वरित अनुदानसुत्र लागू करावे, आॅनलाईन संच मान्यतेतील त्रुटी दूर करून प्रचलीत निकषानुसार संच मान्यता करण्यात यावी, केंद्राप्रमाणे ७ वा वेतन आयोग शिक्षकांना त्वरित लागू करावा, वय वर्षे ६ ते १८ वयोगटातील सर्व मुलांना मोफत दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून द्यावे, २४ वर्षे सेवा झालेल्या पात्र सर्व शिक्षकांना सरसकट निवडश्रेणी देण्यात यावी, आदी ३३ मागण्यांचे निवेदन शिक्षणाधिकारी संजय डोर्लीकर यांना देण्यात आले.या आंदोलनाचे नेतृत्व विजुक्टाचे अध्यक्ष प्रा. अशोक पोफळे, जिल्हा सचिव प्रा. धनंजय पारके, प्रा. राजेंद्र झाडे यांनी केले. यावेळी अनेकांचा सहभाग होता.