शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरांचे आज देशभरात आंदोलन

By admin | Updated: June 6, 2017 00:38 IST

डॉक्टरांवरील हल्ले रोखण्यासाठी राष्ट्रीय पातळीवरचा कायदा संसदेने मंजूर करावा यासह अन्य मागण्यांसाठी इंडियन मेडीकल असोसिएनतर्फे ‘दिल्ली चलो’ अभियान राबविण्यात येणार आहे.

चंद्रपुरात आयएमएचे आंदोलन : कायदा करण्याची मागणीलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : डॉक्टरांवरील हल्ले रोखण्यासाठी राष्ट्रीय पातळीवरचा कायदा संसदेने मंजूर करावा यासह अन्य मागण्यांसाठी इंडियन मेडीकल असोसिएनतर्फे ‘दिल्ली चलो’ अभियान राबविण्यात येणार आहे. यात ६ जूनला सकाळी ८ ला देशातील सर्व डॉक्टर्स ‘इंडिया गेट’वर धरणे आंदोलन करणार आहेत. तसेच सर्र्वत्र आयएमए च्या शाखामध्ये सकाळी ९ ते दुपारी १ पर्यंत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. आंदोलनाविषयी आयएमएच्या शाखेचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य डॉ. मंगेल गुलवाडे, अध्यक्ष डॉ. विजय करमरकर, सचिव डॉ. मनीष मुंधडा, राज्य कार्यकारिणी सदस्य पियुष मुत्यालवार यांनी, १८ राज्यांमध्ये हल्ल्याविरोधात कायदे झाले आहेत. मात्र तरीही असे प्रकार थांबताना दिसत नाहीत. त्यामुळे राष्ट्रीय पातळीवरचा कायदा संसदेने मंजूर करावा. आयएमए जेनेरिक औषध वापराच्या बाजूने आहे. पण या औषधांची गुणवत्ता व एकसमान किंमत याबाबत सरकारने खात्री व हमी द्यावी. केंद्र सरकार मेडीकल कौन्सिल आॅफ इंडिया बरखास्त करून त्याऐवजी लालफितीच्या डॉक्टरांचे प्रत्यक्ष प्रतिनिधित्व नसलेले नॅशनल मेडीकल कमिशन आणू पाहत आहे. त्याऐवजी मेडीकल कौन्सिल आॅफ इंडिया याच संस्थेत आवश्यक ती सुधारणा करावी. एमबीबीएस करताना तो विद्यार्थी विविध प्रकारच्या परीक्षा सरकारमान्य विद्यापीठातून देत असतो. नंतर एमबीबीएस उत्तीर्ण केल्यावरही प्रॅक्टीस सुरू करण्यासाठी आणखी एक नेक्स्ट नावाची परीक्षा सुरू करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. अशी परीक्षा रद्द करावी, तसेच एमबीबीएसची अंतीम वर्षाची परीक्षा राष्ट्रीय स्तरावर घेण्यात यावी, परीक्षेचा निकाल लागल्यांतर ४५ दिवसाच्या आत पीजी-नीट परीक्षा घ्यावी, वैद्यकीय व्यवसाय व निष्काळजीपणामुळे होणाऱ्या कायदेशीर कारवाईत गुन्हेगारी स्वरूपाचे कलम लावू नये, आंतर-मंत्रालयीन समितीने केलेल्या शिफारशींची अंमलबजावणी करावी आदी मागण्यांचा समावेश आहे.