चंद्रपूर : स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण झाले पाहिजे, या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांनी चंद्रपूर, राजुरा आणि गडचांदूर येथे आंदोलन केले. तिनही ठिकाणी दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत मुख्य महामार्गावरून जाणाऱ्या प्रवासी आणि वाहन चालकांना अडवून स्वतंत्र्य विदर्भ मागणीचे पत्रक देण्यात आले. तर अनेक वाहनांना विदर्भ राज्याचे स्टिकर लावण्यात आले. या अभिनव आंदोलनात शेकडो कार्यकतर्ते सहभागी झाले होते.राजुरा येथील बसस्थानक चौकात बुधवारी दुपारी १२ वाजता विदर्भ राज्य आंदोलन समितीचे शेकडो कार्यकर्ते जमले. कार्यकर्त्यांनी हैदराबाद, आदिलाबाद व चंद्रपूर मार्गावरील बसेस, ट्रक्स, कार, आॅटो व दुचाकी वाहनांवर जय विदर्भचे स्टिकर लावले. यावेळी वाहन चालकांना विदर्भाच्या समस्या आणि स्वतंत्र विदर्भ राज्य कसे सक्षम होऊ शकते, याची माहिती देणारे पत्रक देण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व माजी आमदार अॅड. वामनराव चटप, अॅड. मुरलीधर देवाळकर, प्राचार्य अनिल ठाकूरवार, डॉ. भूपाळ पिंपळशेंडे, अॅड. राजेंद्र जेनेकर, रमेश नळे, शशीकला ढवस, नरेंद्र काकडे, प्रभाकर ढवस, शेषराव बोंडे, डॉ. गंगाधर बोढे, सुरेश आस्वले, मारोतराव येरणे, सुभाष रामगिरवार, गरिबदास चौधरी, आबाजी ढवस, मारोतराव लोहे, आबाजी धानोरकर, दत्तु ढोके, हरिदास बोरकुटे, भाऊजी कन्नाके, भिवसेन गायकवाड, प्रभाकर लोहे, भास्कर लोहे यांनी केले.चंद्रपूर येथील रामनगर पोलीस ठाणे चौकात किशोर पोतनवार, श्रीधर बल्की, दिवाकर माणूसमारे, अनिल दिकोंडावार, विक्की गुप्ता, विजय बोरगमवार, वासुदेव दुर्गे, रमेश गोहणे, गोपी मित्रा, नितीन भागवत, रमेश चांदेकर, सुधाकर नमिल्ला यांनी पान-फूल स्टिकर लगाओ आंदोलनाचे नेतृत्व केले. गडचांदूर येथील आंदोलनातही शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. (स्थानिक प्रतिनिधी)
स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी आंदोलन
By admin | Updated: April 2, 2015 01:26 IST