शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
2
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
3
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
4
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
5
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
6
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
7
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
8
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
9
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
10
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
11
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
12
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
13
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
14
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
15
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
16
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
17
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
18
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
19
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
20
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
Daily Top 2Weekly Top 5

मालमत्ता करवाढविरोधात आंदोलन

By admin | Updated: March 8, 2016 00:37 IST

चंद्रपूर महानगरपालिकेने मालमत्ता करात चार ते पाच पट वाढ केली आहे.

साखळी उपोषण : मनपाने करवाढ मागे घ्यावीचंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेने मालमत्ता करात चार ते पाच पट वाढ केली आहे. ही करवाढ अन्यायकारक व सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडणारी आहे. ही करवाढ मागे करण्यात यावी, या व इतर आणखी काही मागण्यांच्या पूर्ततेकरिता भारतीय राष्ट्रीय काँग्रेस लोकशाही आघाडीच्या वतीने आंदोलन छेडण्यात आले आहे. या आंदोलनांतर्गत येथील गांधी चौकात मनपातील काँग्रेसचे नगरसेवकच आज सोमवारपासून साखळी उपोषणाला बसले आहेत.महानगरपालिकेने एका खासगी कंपनीच्या माध्यमातून चंद्रपुरातील मालमत्तेचे सर्वेक्षण केले. मात्र हे सर्वेक्षण चुकीच्या पध्दतीने करण्यात आले आहे. त्यातही मनपाने मालमत्ता करात चार ते पाच पट वाढ करून चंद्रपूकरांवर अन्याय केला आहे. याबाबत काँग्रेस नगरसेवकांनी वारंवार मनपाच्या आमसभेत प्रश्न उपस्थित करून करवाढ मागे घेण्याची मागणी केली. मात्र मनपा प्रशासनाने याकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे आता भारतीय राष्ट्रीय काँग्रेस लोकशाही आघाडीच्या माध्यमातून नगरसेवकांनी आंदोलन छेडले आहे. सोमवारपासून काँग्रेस नगरसेवकांनी गांधी चौकात साखळी उपोषण सुरू केले आहे. आज नगरसेवक प्रशांत दानव, प्रवीण पडवेकर, राजेश यादव व सुनील बोरणे हे उपोषणाला बसले आहेत. बाबुपेठ उड्डाण पुलाचे काम रखडत चालले आहे. याकडे पालकमंत्री जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत. शासनाने बाबुपेठ उड्डाण पुलाचे काम तात्काळ सुरू करावे, चंद्रपुरातील झोपडपट्टीधारकांना सरकारी जमिनीचे पट्टे देण्यात यावे, इरई व झरपट नदीचे खोलीकरण करण्यात यावे व संरक्षण भिंतीचे बांधकाम त्वरित करण्यात यावे, चंद्रपूर पंचाशताब्दी महोत्सवानिमित्त मिळालेल्या निधीतील उर्वरित २२५ कोटी रुपये शासनाने त्वरित द्यावे व हा निधी सर्व प्रभागाच्या विकासासाठी समप्रमाणात देण्यात यावा, या मागण्याही काँग्रेस नगरसेवकांनी रेटून धरल्या आहेत. (शहर प्रतिनिधी)नागरिकांनी कर भरू नयेमनपाने नियमाला तिलांजली देत मालमत्ता करात वाढ केली आहे. नागपूरच्या महापौरांच्या घराचा टॅक्स १६०० रुपये येते. मात्र चंद्रपुरातील गरीब नागरिकाला दोन हजार रुपये गृहकर भरावा लागत आहे. ही लूटमार आणि अन्याय सहन केला जाणार नाही. यासाठी रस्त्यावर येऊन आंदोलन करू, न्यायालयात जाऊ. जोपर्यंत राज्यकर्ता व न्यायपालिका न्याय देणार नाही, तोपर्यंत आमचा संघर्ष सुरूच राहणार आहे. जोपर्यंत न्याय मिळणार नाही, तोपर्यंत नागरिकांनीही मालमत्ता कर भरू नये, असे आवाहन माजी खासदार नरेश पुगलिया यांनी केले. नागपूरपेक्षा जास्त चंद्रपुरात मालमत्ता कर- पुगलियाचंद्रपूर महानगरपालिका चंद्रपुरातील मालमत्तेवर नागपूरपेक्षाही जास्त कर लादत असून चंद्रपूरच्या नागरिकांनी याला कडाडून विरोध केला पाहिजे, अशी माहिती माजी खासदार नरेश पुगलिया यांनी सोमवारी उपोषण मंडपात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले, महानगरपालिकेला जास्तीत जास्त २० टक्क्यापर्यंत मालमत्ता करात वाढ करता येते. नवीन नियमानुसार महापालिका या करात ४० टक्क्याहून जास्त वाढ करू शकत नाही. परंतु चंद्रपूर महानगरपालिकेने नियमाला तिलांजली देत मालमत्ता करात चार ते पाच पट वाढ केली आहे. हे सांगताना त्यांनी काही उदाहरणेही दिली. कमरुद्दीन यांना पूर्वी ८१७ रुपये मालमत्ता कर येत होता. आता सरळ २ हजार ५२३ रुपये गृहकर आला आहे. किसन बनकर यांना पूर्वी २६४ रुपये गृहकर येत होता. त्यांनाही आता दोन हजार ६९७ रुपये गृहकर आला आहे. आपला स्वत:चा गृहकर सहापट अधिक आला आहे. आपण हा कर भरून टाकू. मात्र गरीब नागरिक असा अवाढव्य कर कसे काय भरणार आहेत, असेही पुगलिया म्हणाले. आतापर्यंत शहरातील २५ हजार मालमत्ताधारकांनी या करवाढीवर आक्षेप घेतला आहे. ११ मार्चपर्यंत आणखी संख्या वाढणार आहे. वाहन पार्र्किंगसह अन्य काही कर मनपाने लादले आहे. यावरही पुगलिया यांनी टोला लगावला. ते म्हणाले, शासन विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी देत आहे. तरीही मनपा प्रशासन व पदाधिकारी विविध करात वाढ करून नागरिकांना त्रास्त देत आहेत. ही बाब अन्यायकारक असल्याचेही त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला नगरसेवक अशोक नागापुरे, जिल्हा परिषद सदस्य विनोद अहीरकर, गजानन गावंडे, रत्नमाला बावने, सकीना अंसारी, देविदास गेडाम, स्वप्नील तिवारी, देवेंद्र बेले आदी उपस्थित होते.