शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

न्यूनगंड न बाळगता ध्येयाकडे वाटचाल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 23:13 IST

अंधश्रद्धेचा परिणाम विद्यार्थ्यांच्या जडणघडण व मानसिकतेवर मोठ्या प्रमाणात होतो. ज्यामुळे विद्यार्थ्यांचे संपूर्ण भावविश्व व भवितव्य नकारात्मकरित्या प्रभावित होते.

ठळक मुद्देनितीन पाथोडे : स्पर्धा परीक्षेवर व्याख्यान

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : अंधश्रद्धेचा परिणाम विद्यार्थ्यांच्या जडणघडण व मानसिकतेवर मोठ्या प्रमाणात होतो. ज्यामुळे विद्यार्थ्यांचे संपूर्ण भावविश्व व भवितव्य नकारात्मकरित्या प्रभावित होते. परिणामी भितीसोबतच अनेक न्यूनगंडाने विद्यार्थी बळी पडतात. त्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करताना विद्यार्थ्यांनी मनात कुठलाही न्यूनगंड न बाळगता, ध्येयाकडे वाटचाल करावी यश नक्कीच मिळेल, असे प्रतिपादन मंत्रालयात राजस्व विभागात कार्यरत सहायक आयुक्त नितीश पाथोडे यांनी केले.अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि वासनिक अ‍ॅकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्पर्धा परीक्षा आणि अंधश्रद्धा’ या विषयावर आयोजित व्याख्यानामाध्ये ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अ.भा.अंनिसचे जिल्हा संघटक अनिल दहागावकर, वासनिक अ‍ॅकॅडमीचे संचालक संजय वासनिक, प्रा.स्निग्धा सदाफळे, अंनसिचे जिल्हाप्रसिद्धी प्रमुख निलेश पाझारे आदी उपस्थित होते. याप्रसंगी अनिल दहागावकर यांनी विद्यार्थ्यानी जीवनात वैज्ञानिक दृष्टीकोनाचा अंगिकार करून सकारात्मरित्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करावा, आणि प्रशासकीय सेवेमध्ये सहभागी होऊन राष्ट्रनिर्माणात योगदान द्यावे, असे विश्वास व्यक्त केले.यावेळी नितीश पाथाडे यांनी विद्यार्थ्यांनी थेट संवाद साधत स्पर्धा परीक्षांशी संबंधित विविध समस्या, विद्यार्थ्यांना पडणारे प्रश्न, स्वत:चा अनुभव कथन केला. तसेच विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नाची उत्ते दिली. यावेळी अनेकांची उपस्थिती होती.