शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

पेपर कठीण गेल्यानं टोकाचं पाऊल, मुलाला पोटाशी बांधून आईची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 10:14 IST

बी.कॉम. अभ्यासक्रमाचा पेपर बिघडल्यामुळे नैराश्याच्या गर्तेत सापडलेल्या आईने स्वत:च्या पोटच्या गोळ्याला पदराने पोटाला बांधून रामाळा तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली.

ठळक मुद्देपेपर बिघडल्यामुळे केला घातयापूर्वी रेल्वेखाली जीव देण्याचा केला होता प्रयत्नमुलाला पदरानं पोटाला बांधले आणि तलावात घेतली उडी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : बी.कॉम. अभ्यासक्रमाचा पेपर बिघडल्यामुळे नैराश्याच्या गर्तेत सापडलेल्या आईने स्वत:च्या पोटच्या गोळ्याला पदराने पोटाला बांधून रामाळा तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून सर्वत्र हळहळही व्यक्त केली जात आहे. त्यापूर्वी तिने रेल्वेखाली येऊन जीवनयात्रा संपवण्याचाही प्रयत्न केला होता. मात्र एका व्यक्तीने हटकल्यामुळे तो मार्ग सोडून तिने तलावात उडी घेतली.

रुपाली आशिष गुज्जेवार (२८) व अभीर आशिष गुज्जेवार (५) रा. पी.एच.नगर. जुना पॉवर हाऊसजवळ चंद्रपूर असे मृत मायलेकाचे नाव आहे. रुपालीचा सोमवारी बी.कॉमचा पेपर होता. तिच्या सासऱ्याने तिला पडोली येथील समाजकार्य महाविद्यालयात असलेल्या केंद्रावर पोहचवून दिले. पेपर सुटल्यानंतर रुपाली घरी आली. मात्र पेपर बिघडल्यामुळे ती अस्वस्थ होती. तिचा मुलगा अभीर शिकवणी वर्गात गेला असल्याने रुपाली बॅग घेऊन शिकवणी वर्गात गेली. त्यानंतर आपली बॅग व अभीरची ट्युशन बॅग तिथेच ठेवून ‘काही वेळात येते’ असे सांगत ती बाहेर गेली. त्यानंतर रुपाली थेट बगड खिडकी परिसरातील रेल्वे लाईनवर आत्महत्या करण्याच्या उद्देशाने गेली. रेल्वे फाटक बंद असल्याने ती फाटकाखालून रुळावर गेली. मात्र तिथे उपस्थित एका व्यक्तीने तिला थांबविले. त्यानंतर ती रुळावरून परत आली, अशी माहिती पोलीस सूत्राने दिली. सोमवारी दोघेही घरी आले नाही.

यादरम्यान, अभीर बेपत्ता झाल्याचे वृत्त सोशल मीडियावरून व्हायरल झाले होते. गुज्जेवार कुटुंबीयांनीही दोघेही बेपत्ता झाल्याची तक्रार शहर पोलिसात केली होती. दरम्यान, रामाळा तलावाच्या काठावर अभीरची चप्पल पडून असल्याचे एका व्यक्तीला दिसले. त्यांनी याबाबत गुज्जेवार कुटुंबीयांना कळविले होते. दरम्यान, बुधवारी रामाळा तलावात गेलेल्या मच्छिमारांना रुपाली व अभीरचा मृतदेहच आढळून आला. याबाबतची माहिती रामनगर पोलिसांना मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक, रामनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अशोक कोळी, उपपोलीस निरीक्षक रामटेके यांनी तलावातून दोन्ही मृतदेह बाहेर काढून पंचनामा केला. तसेच प्रेत शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला.पेपर बिघडल्याने आत्महत्यारुपाली हिचे पती चंद्रपुरात एका वाहनाच्या शोरुममध्ये काम करतात. रुपाली यांनी आत्महत्या करण्यापूर्वी आपली बॅग शिकवणी वर्गात ठेवली होती. त्यातील एका डायरीत तिने आत्महत्येचे कारण नमूद करून ठेवल्याचे पोलिसांना तपासात आढळून आले. ‘माझा बी.कॉमचा पेपर बिघडल्यामुळे मी आत्महत्या करीत आहे’, असे रुपाली यांनी डायरीमध्ये लिहून ठेवले आहे, अशी माहिती रामनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अशोक कोळी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.पोलिसांची असंवेदनशीलताया घटनेत पोलिसांची असंवेदनशीलताही दिसून आली. एकीकडे चार वर्षीय बालक व त्याच्या आईचा मृतदेह तलावात तरंगत असताना शहर ठाणे व रामनगर ठाण्यातील पोलीस सीमावादात अडकून राहिले. तलावातील पाणी रामनगर पोलिसांच्या हद्दीत तर तलावाची पाळ शहर पोलिसांच्या हद्दीत असल्याचे पोलीस सांगत राहिले. घटनास्थळी शहर पोलीस पोहचले. मात्र रामनगर पोलीस घटनास्थळी येईपर्यंत ते प्रतीक्षाच करीत राहिले. बऱ्याच वेळानंतर रामनगर पोलीस घटनास्थळावर आले आणि त्यानंतर दोघांचाही मृतदेह बाहेर काढण्यात आला.

टॅग्स :Suicideआत्महत्याEducationशिक्षण