शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

घराघरात बांधलेले बहुतांश शौचालय झाले स्टोअर रूम

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2024 14:23 IST

घरोघरी शौचालये : मात्र नागरिकांकडून वापरच नाही

शशिकांत गणवीर लोकमत न्यूज नेटवर्क भेजगाव : उघड्यावर शौचाला बसल्याने विविध आजारांचा सामना करावा लागतो. हे टाळण्यासाठी शासनाने घरोघरी शौचालय बांधण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी हगणदारीमुक्त गावाचा संकल्प करण्यात आला. त्यानुसार घरोघरी शौचालये बांधण्यात आली. त्यासाठी शासनाकडून अनुदानही मिळाले. मात्र, ग्रामीण जनतेची मानसिकता बदलली नसल्याने आजही ग्रामीण भागात बाहेर शौचास बसत असल्याचे दिसते.

मात्र आता ग्रामीण भागात वन्यप्राण्यांचा वावर वाढल्याने बाहेर शौचास जाणे जिवावर बेतणारे ठरत असल्याने भीतीपोटी का असेना, शौचालयाचा वापर करणे गरजेचे झाले आहे. मात्र, ग्रामीण भागात शौचालयाचा वापर होत नसल्याने गावाशेजारील रस्त्यावर घाण पसरली आहे. त्यामुळे शासनाच्या हगणदारीमुक्तीचे स्वप्न नागरिकांच्या उदासीनतेमुळे भंगत असल्याचे चित्र दिसत आहे. 

आरोग्याच्या दृष्टीने, तसेच विशेषतः महिलांच्या सोयीसाठी ग्रामीण भागात शौचालय बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. सन २०१४ पासून केंद्र शासनासोबतच राज्य शासनानेदेखील याला पाठबळ दिले. त्यामुळे शौचालयाचे महत्त्व जनतेला कळले. पंचायत समितीमार्फत शौचालय बांधण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम अमलात आणला गेला. विविध पुरस्कार मिळत असल्याने प्रशासन व लोकप्रतिनिधीदेखील कामाला लागले. 

'नऊ दिवस नवलाईचे' या म्हणीप्रमाणे काही दिवस याचा परिणाम जनमानसात टिकून राहिला. हगणदारीमुक्त गावाची संकल्पना ही लोकचळवळ होण्याची गरज होती. मात्र, पुरस्कारापुरती निर्माण झालेली चढाओढ फार काळ टिकू शकली नाही. संपूर्ण तालुका, जिल्हा हगणदारीमुक्त दाखवायचे असल्याने कागदावरच हगणदारीमुक्त गाव रेखांकित करण्यात आले. गेल्या आठ वर्षापासून सुरू असलेल्या या हगणदारीमुक्त गावाची संकल्पना आजही तालुक्यात साकारली नाही. 

वन्यप्राण्यांचे हल्ले टाळण्यासाठी तरी करा शौचालयाचा वापर ग्रामस्थांनी हगणदारीमुक्त गावाकरिता शौचालय बांधले. मात्र, वापर टाळला. जनतेने अनुदान मिळते म्हणून शौचालयाचे बांधकाम केले. मात्र, वापर काही मोजक्या गावातच केला जात असल्याचे दिसून आले. आता ग्रामीण भागातील जनतेला शौचालयाचा वापर करण्याची मानसिकता बदलण्याची शक्यता बळावली आहे. कारण ग्रामीण भागात वन्यप्राण्यांचे हल्ले वाढले असल्याने शौचास बाहेर जाणे टाळून घरी बांधलेल्या शौचालयाचा वापर करणे गरजेचे झाले आहे. भविष्यात वन्यप्राण्यांचे होणारे हल्ले टाळण्यासाठी या निमित्ताने का असेना शौचालयाचा वापर करणे काळाची गरज बनली आहे.

 

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर