शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
4
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
5
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
6
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
7
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
8
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
9
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
10
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
11
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
12
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
13
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
14
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
15
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
16
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
17
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
18
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
19
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं

गोंडवाना विद्यापीठाच्या अभ्यास मंडळांवर बहुतांश सदस्य अविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 00:30 IST

गडचिरोली व चंद्रपूर जिल्हे कार्यक्षेत्र असलेल्या गोंडवाना विद्यापीठाच्या विविध अभ्यासमंडळात बहुतांश सदस्यांची अविरोध निवड झाली. प्रत्येक अभ्यास मंडळांमधून ३ याप्रमाणे ८६ अभ्यास मंडळांमधून २५८ प्रतिनिधी निवडायचे होते.

ठळक मुद्दे सात मंडळांसाठीच निवडणूक : उशिरापर्यंत चाचली मतमोजणी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : गडचिरोली व चंद्रपूर जिल्हे कार्यक्षेत्र असलेल्या गोंडवाना विद्यापीठाच्या विविध अभ्यासमंडळात बहुतांश सदस्यांची अविरोध निवड झाली. प्रत्येक अभ्यास मंडळांमधून ३ याप्रमाणे ८६ अभ्यास मंडळांमधून २५८ प्रतिनिधी निवडायचे होते. मात्र फक्त ३६ अभ्यास मंडळांकरिता नामनिर्देशनपत्र आले होते. त्यापैकी २९ अभ्यासकमंडळांकरिता ३ व त्यापेक्षा कमी नामांकन आले. त्यामुळे केवळ ७ अभ्यास मंडळांसाठी निवडणूक झाली.यात विज्ञान व तंत्रज्ञान गटात भौतिकशास्त्र विषयासाठी डॉ.पांडुरंग मोहरकर, रमेश ठोंबरे व रणजित मंडल, रसायनशास्त्रासाठी अपर्णा धोटे, प्रवीण जोगी, डॉ.व्ही.के. बत्रा, गणितासाठी डॉ.चेतना भोंगडे, डॉ.लालसिंग खालसा व डॉ.ज्ञानदेव वºहाडे, या गटात बिनविरोध निवडल्या गेलेल्यांमध्ये जनरल इंजिनिअरिंग अप्लाईड सायन्स अ‍ॅन्ड ह्युमॅनिटी विषयासाठी व्ही.एस.गोगुलवार, ए.एस.पावडे, एन.एस.बिसेन, इलेक्ट्रीकल इंजिनिअर विषयासाठी जाफर खान, राजेंद्र धात्रक, कॉम्प्युटर टेक्निकसाठी रहिला शेख, जीव रसायनशास्त्रसाठी डॉ.गोपाल गोंड, भूविज्ञानशास्त्रसाठी डॉ. चंद्रकांत डोर्लीकर, डॉ. किशोर कोरडे, इलेक्ट्रॉनिक्स इन्स्ट्र्युमेंटेशनसाठी डॉ. अमृत लांजे, डॉ. धनंजय गहाणे, पर्यावरण विज्ञानसाठी महेंद्र ठाकरे, डॉ. बालसुब्रह्मण्यम श्रीनिवास, डॉ. केशव कळसकर, सुक्ष्म जीवशास्त्रासाठी डॉ. विजय वाढई, डॉ. प्यारेलाल कुंभारे, अजय सोळुंखे, भाषा व विज्ञानसाठी ज्योती तायगान, डॉ. मिनाक्षी तुंबडे, संभारी वरकड, प्राणीशास्त्रासाठी डॉ. लक्ष्मण रोहणकर, अमिर धमानी, गणपत देशमुख, वनस्पतीशास्त्रासाठी डॉ. वसंती रेवतकर, अनिल कोरपेनवार, संजय दुधे, सिव्हील स्थापत्य अभियांत्रिकीसाठी डॉ. ए. झेड. चिताळे, डॉ. ए. पी. सिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी प्रविण पोटदुखे, राजेश ठोंबरे, विनोद गोरंटीवार, मायनिंग इंजिनिअरींगसाठी मनिष उत्तरवार, इन्स्ट्र्युमेंटेशन इंजिनिअरींगसाठी नवनाथ नेहे याशिवाय वाणिज्य व व्यवस्थापनसाठी डॉ. रवींद्र मुरमाडे, यशवंत घुमे, श्रीलता पिल्लई यांची निवड झाली.बिझनेस एडमिनीस्ट्रेशन अ‍ॅन्ड मॅनेजमेंटसाठी डॉ. रेखा मेश्राम, जयदेव देशमुख, उत्तम घोसरे, बिझनेस इकॉनॉमिक्ससाठी तात्याजी गेडाम, हरिश्चंद्र कामडी, डॉ. बंडू जांभुळकर, अकाऊंट स्टॅटीकस्टीकसाठी उत्तमचंद कांबळे, सुखदेव उमरे, डॉ. विजय टोंगे, विज्ञानसाठी डॉ. विश्वनाथ लाडे, डॉ. सुनिल नरांजे, चंद्रभान जीवणे, हिंदीसाठी डॉ. सुनिता बन्सोड, डॉ. कल्पना कावळे, डॉ. सरीता तिवारी, मराठीसाठी अनमोल शेंडे, डॉ. सुदर्शन दिवसे, डॉ. धनराज खानोरकर, इतिहाससाठी भुपेश चिकटे, दिवाकर कामडी, डॉ. शरद बेलोरकर, भूगोलसाठी योगेश्वर दुधपचारे, डॉ. रवींद्र रणदिवे, इंग्रजीसाठी डॉ. चंद्रमौली अमुदला, बालकृष्ण कोंगरे, सुनिल बिडवाईक, अर्थशास्त्रासाठी डॉ. पी. बी. तितरे, जनार्धन काकडे, श्रीराम कावळे, समाजशास्त्रासाठी राजेंद्र बारसागडे, डॉ. दिवाकर उराडे, पंढरी वाघ यांची निवड झाली.गृहअर्थशास्त्रासाठी सरोज झंझाळ, डॉ. वंदना वैद्य, अमिता बन्नोरे, संगीतसाठी प्रमोद रेवतकर, विधीसाठी डॉ. एम. जे. बेन्नी, इजाज शेख, इन्युघंटी राव, राज्यशास्त्रासाठी अशोक बहादुरे, डॉ. दिनकर चौधरी, अशोक खोब्रागडे, समाजकार्यासाठी डॉ. सुनिल साकुरे यांची अविरोध निवड झाली आहे. बुधवारी रात्री उशिरापर्यंत मतमोजणी सुरूच होती. गुरूवारी सकाळी सर्व निकाल हाती आल्यानंतर विजेत्याची घोषणा करण्यात आली.गोंडवाना विद्यापीठाचा असाही कारभारबुधवार दिनांक १३ ला सकाळी ९ वाजता गडचिरोलीच्या शासकीय तंत्रनिकेतनमध्ये मतमोजणीची प्रक्रिया सुरू झाली. मात्र प्रत्यक्ष शेवटचा निकाल जाहीर करण्यास गुरूवारची पहाट उगवली. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यातील उमेदवारांसह त्यांच्या समर्थकांचे चांगलेच हाल झाले. विशेष म्हणजे, मतमोजणी प्रक्रिया आटोपताच निवडणूक निकालाची जबाबदारी सांभाळणारे कुलसचिव दीपक जुनघरे मोबाईल बंद करून सायंकाळपर्यंत विद्यापीठात आलेच नाही. कुलगुरू कल्याणकर काही वेळासाठी आले पण प्रसारमाध्यमांना निकालाची प्रत शुक्रवार दिनांक १४ डिसेंबरला दिली जाईल, असे सांगत त्यांनीही विद्यापीठातून काढता पाय घेतला. या प्रकारानंतर प्रसारमाध्यमांनी संतप्त भावना व्यक्त केल्यानंतर सायंकाळी ६.१५ वाजता कुलसचिव जुनघरे यांनी निकालाची प्रत जाहीर केली.