शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागात शौचालयापेक्षा मोबाईलला जास्त महत्त्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 11:40 IST

केंद्र शासनाने स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छतेवर भर दिला आहे. यासाठी यंत्रणा कामाला लागली आहे. विविध योजनांतर्गत जनतेला स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले जात आहे. पण काही भागातील ग्रामीण जनता यापासून अनभिज्ञ आहे.

ठळक मुद्देशौचालय वापराकडे नागरिकांची पाठ

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : केंद्र शासनाने स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छतेवर भर दिला आहे. यासाठी यंत्रणा कामाला लागली आहे. विविध योजनांतर्गत जनतेला स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले जात आहे. पण काही भागातील ग्रामीण जनता यापासून अनभिज्ञ आहे. आजही ग्रामीण भागातील काही कुटूंब शौचालयाला कमी आणि मोबाईलला अधिक महत्त्व देत असल्याचे दिसून येत आहे.हातात झाडू घेवून पंतप्रधानांनी जनतेला स्वच्छतेचा मंत्र दिला, पण प्रशासनातीलकाही अधिकाऱ्यांच्या उदासीन धोरणामुळे शासकीय योजना ग्रामीण भागात प्रभावीपणे पोहोचलीच नसल्याची जिल्ह्यात स्थिती आहे. परिणामी, या भागात राहणारी गरीब जनता स्वच्छतेच्या योजनेपासून दूर आहे. शौचालयाकरिता संचित रक्कम खर्च करण्याऐवजी त्या रकमेतून मोबाईल खरेदी करण्याकडे तरुण पिढीचा कल अधिक आहे. विज्ञान युगात प्रत्येक कुटुंबातील मोबाईल फोन असणे गरजेचे आहे, तसेच प्रत्येक कुटुंबात शौचालय असणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. स्वच्छतेकडून समृद्धीकडे घेवून जाण्यासाठी राज्यात संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानाला ग्रामीण भागात चांगला प्रतिसाद मिळाला. २०१३ पासून हागणदारी मुक्त संकल्पना पुढे आली. ग्रामीण परिसरातील बºयाच गावातील कुटुंबात शौचालय नसल्याने निर्मलग्राम योजनेच्या माध्यमातून गावोगावी शौचालय बांधण्यात आली. शौचालयाचा वापर वाढल्याने गावात स्वच्छता दिसत होती. बारा निकषांच्या आधारावर निर्मल गावांची निवड झाली. निवड झालेल्या गावांना पुरस्कार मिळाले व विशेष निधी दिला गेला, पण त्या गावांना स्वच्छता टिकवून ठेवण्यात पाहिजे तसे यश आले नसल्याचे चित्र आहे. प्रत्येक कुटुंबात शौचालय असावे, त्याचा वापर नियमित व्हावा म्हणून जनजागृती करण्याची गरज आहे.

रस्त्याच्या कडेलाच उरकला जातो प्रात:विधीग्रामीण भागात काहींनी शौचालय बांधले असले तरी त्याचा वापर न करता त्यात शेतीची अवजारे, सरपण ठेवले जात आहे. गावाच्या मुख्य मार्गाच्या कडेलाच ग्रामस्थ शौचास बसतात, घरी शौचालय असताना नागरिक त्याचा वापर न करता रस्त्यावर घाण करीत असल्याने गावाचे आरोग्य धोक्यात आले आहे. मोबाईल व शौचालयाची मोजणी केल्यास मोबाईल फोन अधिक आढळून येतात. उघड्यावर शौचास जाणाऱ्यांवर शासनाने दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश दिले असले, तरी ते सध्या कागदावरच असल्याने या योजनेला हरताळ फासल्या जात आहे.

टॅग्स :Mobileमोबाइल