शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: नगरपरिषदेत चुरशीची लढाई: ठाकरेंच्या शिवसेनेने खाते उघडले, काँग्रेसही आघाडीवर; पहा लेटेस्ट अपडेट
2
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
3
Nagar Parishad Election Result: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
4
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
5
नात्याला काळीमा! विमा पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
6
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
7
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
8
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
9
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
10
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
11
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
12
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
13
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
14
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
15
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
16
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
17
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
18
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
19
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
20
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

खून, फसवणूक, विनयभंगाची प्रकरणे अधिक

By admin | Updated: February 12, 2015 00:57 IST

बल्लारपूर शहराची ओळख ‘मिनी भारत’ म्हणून केली जाते. औद्योगिक क्षेत्र असून येथे जागतिक दर्जाचा कागद उद्योग, सागवन लाकडाचे आगार, वेकोलिच्या खाणी, पाईप उद्योग असल्यामुळे ...

अनेकश्वर मेश्राम बल्लारपूरबल्लारपूर शहराची ओळख ‘मिनी भारत’ म्हणून केली जाते. औद्योगिक क्षेत्र असून येथे जागतिक दर्जाचा कागद उद्योग, सागवन लाकडाचे आगार, वेकोलिच्या खाणी, पाईप उद्योग असल्यामुळे कामगारांची संख्या मोठी आहे. राज्याची सीमा बदलणारे रेल्वे स्थानक येथेच आहे. परिणामी शहरात आंध्रप्रदेश, उत्तरप्रदेश, बिहार, केरळ, कलकत्ता व अन्य राज्यातील कामगारांनी व नागरिकांनी येथील वास्तव्याला पसंती दिली. सामाजिक सलोखा राखत असतानाच काही गुन्हेगार प्रवृत्ती डोके वर काढत आहे. विविधतेत राहणाऱ्या नागरिकांना एकसूत्रता ठेवण्यासाठी व गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्याचा प्रयत्न पोलीस प्रशासनाकडून केला जात आहे. तरीही मागील वर्षी बल्लारपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाच खून, चार खूनाचा प्रयत्न, दोन फसवणूक, १५ घरफोड्या व १२ विनयभंगाचे प्रकार घडले आहे. सामाजिक सलोख्यासाठी केला जातो प्रयत्नबल्लारशाह पोलीस ठाण्याने आजवर अनेक गंभीर गुन्ह्याचा अनुभव घेतला आहे. येथे नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष डॉ. विजय वडस्कर यांच्या कथित खूनाचे प्रकरण चांगलेच गाजले होते. दुहेरी खूनाचा प्रकारही घडला. खून करुन प्रेत स्मशानभूमीत पुरल्यानंतर प्रकरणाचा उलघडही झाला. तरी कायदा आणि सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्नशिल आहे. आपली समाजव्यवस्था उत्सव प्रिय असल्याने पोलीस ठाण्यांतर्गत शांतता समितीत्यांचे गठन करण्यात आले. सामाजिक कार्यकर्त्यांसोबत राजकीय पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या सभा धार्मिक सण, गणेशोत्सव, दुर्गाेत्सोव व शारदा उत्सवादरम्यान घेण्यात येवून समन्वयाची भूमिका पोलीस प्रशासनाला पार पाडावी लागते. सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान पोलिसांवर ताण येतो. त्यावर येथील पोलिसांनी मात करुन सामाजिक व राजकीय सलोखा जोपासण्याचा प्रयत्न या पोलीस ठाण्याने आजवर जपल्याचे दिसून येते. ५ ते ३० कि.मी. विस्तारलेले क्षेत्र बल्लारपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बल्लारपूर नगरपालिका क्षेत्रासह ग्रामीण भागातील १९ गावांचा समावेश आहे. येथील ठाण्यापासून मोहाळी खुर्द व मानोरा गावाचे अंतर तब्बल ३० किलोमीटर असून सर्वात कमी अंतरावरील ग्रामीण बामणी (दुधोली) व विसापूर पाच किलोमीटर अंतरावर आहे. यामध्ये जुनोना, कारवा, आसेगाव, गिलबिली, इटोली, किन्ही, आमडी, कळमना, कोर्टिमक्ता, कोर्टितुकूम, लावारी, दहेली आदी गावांचा समावेश आहे. या पोलीस ठाण्याचे कार्यक्षेत्र पाच किलोमीटरपासून ३० किलोमीटरपर्यंत विस्तारले असून बल्लारपूरसह ग्रामीण भागावरील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सहा बिट तयार करण्यात आले आहेत.पोलीस बळाच्या ‘बॅकलॉग’ची अडचणबल्लारपूर पोलीस ठाणे १९५६ मध्ये अस्तित्वात आले. त्यावेळी दोन अधिकारी जेमतेम ५० कर्मचारी कार्यरत होते. आजघडीला लोकसंख्या वाढली असून कार्य क्षेत्र देखील वाढले आहे. त्यानुसार पोलीस निरीक्षक पदासह सहाय्यक पोलीस निरीक्षक, पाच उपपोलीस निरीक्षक, ३० पोलीस हवालदार, १०७ पोलीस शिपाई असे एकूण १४४ पदे मंजुर आहेत. तरीही येथे तीन पोलीस उपनिरीक्षकांच्या पदांसह ३९ कर्मचाऱ्यांचा अनुशेष आहे. त्यामुळे पोलिसांना कर्तव्य बजावताना पोलीस बळाच्या ‘बॅकलॉग’ची अडचणीला सामोरे जावे लागत आहे. २५ वर धार्मिक स्थळांची संख्यापोलीस ठाण्याच्या हद्दीत धार्मिक स्थळांची संख्या २५ वर आहे. शहरासह ग्रामीण भागात राष्ट्रपिता महात्मा गांधी, छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा, महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्यासह १० पुतळे उभारले आहेत. मुस्लिम धर्माच्या नऊ मशिदही आहेत, अन्य धार्मिक स्थळात गोंडकालीन राजाची समाधी, बालाजी मंदिर, दत्त मंदिर, गुरुद्वारा, चर्च, राममंदिर, दर्गा, विविध मंडळाची बौद्ध विहारे असून आजतागायत येथे अनुचित प्रकार घडला नाही. यावरुन नागरिकांची सर्वधर्मसमभाव वृत्ती पोलिसांना सहकार्य करणारी आहे.मागील वर्षात घडल्या पाच खुनाच्या घटनाबल्लारपूर पोलीस ठाण्यांतर्गत २०१३ च्या तुलनेत गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यात घट झाली असली तरी मागील वर्षी पाच खूनाच्या घटना घडल्या. याप्रकरणात आरोपिना जेरबंद करण्यात आले. यासोबतच चार घटनेत खूनाचा प्रयत्न करण्यात आला. ६४ प्रकरणात सराईत गुन्हेरागांकडून दुखापत करण्यात आली. कायदा व सुव्यवस्था धोक्यात आणण्याच्या अनुषंगाने गुन्हेगार प्रवृत्तीच्या १९ जणांना तडीपार केले आहे. घरफोडीचे १५ व चोरी प्रकरणात १० गुन्हे नोंदवून आरोपिंना जेरबंद करण्यात पोलिसांनी भूमिका बजावली.