शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

५० हून अधिक गावांचा संपर्क तुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2020 05:00 IST

तालुक्यातील उत्तर ब्रम्हपुरीत बेलगाव, कोलारी, अऱ्हेरनवरगाव, पिंपळगाव, हरदोली, चिखलगाव लाडज, सोनेगाव, सावलगाव, बेटाला, पारडगाव, रणमोचन आदी गावात पाण्याची पातळी वाढत असून गावात पाणी शिरले आहे तर दक्षिण ब्रम्हपुरीमध्ये गांगलवाडी, बरडकिन्ही, आवळगाव, वांद्रा, बोळदा, हळदा, मुडझा, एकरा आदी गावात रस्त्यावर पाणी जमा होऊ लागल्याने गावांची वाहतूक बंद झाली आहे.

ठळक मुद्देब्रम्हपुरी तालुक्यातील अनेक गावे जलमय : गोसेखुर्दच्या पाण्यामुळे गावात शिरले पाणी, अनेक रस्ते बंद

रवी रणदिवे ।लोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : मध्यप्रदेशातील संजय सरोवर तुडुंब भरल्याने व भंडारा- गोंदिया जिल्ह्यातील पूजारी टोला ओव्हरलोड झाल्याने गोसेखुर्द धरणाचे ३३ दरवाजे उघडण्यात आले आहे. धरणाची क्षमता लक्षात घेऊन मोठया प्रमाणात शुक्रवारपासून वैनगंगा नदीतून पाण्याचा विसर्ग होत आहे. त्यामुळे पुराच्या पाण्यात वाढ होऊन नदीकाठावरील गावात पाणी शिरून गावे जलमय झाली आहेत. ५० हून अधिक गावांचा संपर्क तुटला आहे. उत्तर ब्रम्हपुरी पाण्याने वेढली तर दक्षिण ब्रम्हपुरीचे रस्ते बंद झाले आहेत.तालुक्यातील उत्तर ब्रम्हपुरीत बेलगाव, कोलारी, अऱ्हेरनवरगाव, पिंपळगाव, हरदोली, चिखलगाव लाडज, सोनेगाव, सावलगाव, बेटाला, पारडगाव, रणमोचन आदी गावात पाण्याची पातळी वाढत असून गावात पाणी शिरले आहे तर दक्षिण ब्रम्हपुरीमध्ये गांगलवाडी, बरडकिन्ही, आवळगाव, वांद्रा, बोळदा, हळदा, मुडझा, एकरा आदी गावात रस्त्यावर पाणी जमा होऊ लागल्याने गावांची वाहतूक बंद झाली आहे. याव्यतिरिक्त शेकडो हेक्टर धान पिकात पाणी शिरल्याने धान पिकांची नासाडी झाली आहे. तर पिंपळगाव, अऱ्हेरनवरगाव, लाडज आदी भागात भाजीपाला पिके वाहून गेली आहेत. घरांची पडझड होण्याची फार मोठी शक्यता निर्माण झाली आहे. गोसेखुर्द धरणाचे अधिकारी शर्मा यांच्याशी फोनवर संपर्क साधला असता त्यांनी हा विसर्ग २४ तास कायम राहील, असे लोकमतला सांगितले. शासकीय अधिकारी, कर्मचारी बेलगाव, लाडज आदी भागातून बोटीद्वारे ग्रामस्थ बाहेर काढून सुरक्षित स्थळी पोहोचविण्याचे कार्य करीत आहेत. पूर ओसरल्यावर शेतीच्या नुकसानीची व घरांच्या पडझडीचे सर्वेक्षण करण्यात येत असल्याची माहिती मिळाली आहे.हजारो लोकांना सुरक्षितस्थळी हलविलेब्रह्मपुरी तालुक्यात नदीबाहेर आठ ते १० किमीपर्यंत पाणी पसरले. त्यामुळे १५ ते २० गावे पाण्याने वेढली. सदर बाब शनिवारी रात्रीच ब्रह्मपुरीचे ठाणेदार बाळासाहेब खाडे यांना माहीत होताच पोलीस स्टेशनच्या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांसह रात्रभर फिरून गावोगावी जाऊन लोकांना बाहेर काढले. याची माहिती ठाणेदारांनी उपविभागीय पोलीस अधिकारी अनुज तारे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे आणि जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांना दिली. त्यांनी तातडीने चंद्रपूर येथून रेस्क्यू टीम पाठविली. ठाणेदार बाळासाहेब खाडे यांनी स्वत: हजर राहून बेटाला, रणमोचन व परिसरातील राईस मिल, पोल्ट्री फॉर्ममधील अडकलेल्या ४० ते ५० मजुरांना सुरक्षित बाहेर काढले. त्यानंतर लाडज या गावात चारही बाजूंनी पाणी शिल्याची माहिती मिळताच ठाणेदार बाळासाहेब खाडे रेस्क्यू टीमसह बोटीने गावात पोहचले. दोन बोटीमार्फत लोकांना पिंपळगावकडे पाठविण्यास सुरुवात केली. याची माहिती पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांना देण्यात आली होती. त्यांनी दोन हेलिकॉप्टर बोलावली. त्याद्वारे व बोटीने एकूण १३५० लोकांना सुरक्षित स्थळी पोहचविण्यात आले.३३ केव्ही उपकेंद्र पुराच्या पाण्यातगांगलवाडी : गोसेखुर्द धरण पूर्ण भरून ओव्हरफ्लो होऊ लागले आहे. त्यामुळे गोसेखुर्द धरणाचे संपूर्ण ३३ दरवाजे उघडल्यामुळे चंद्रपूर, गडचिरोली सीमेवरील वैनगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली. वैनगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर येऊन छोटया नाल्यांना दाब आल्याने ब्रह्मपुरी तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाणी शिरले. अशातच किन्ही चौगान येथे असलेल्या महावितरणच्या ३३ केव्ही उपकेंद्रात पाणी शिरले. उपकेंद्रात येणाऱ्या पाण्याची पातळी झपाटयाने वाढत असल्याने कुठलीही अनुचित घटना घडू नये म्हणून तातडीने महावितरण ब्रम्हपुरी उपविभागाचे अधिकारी लिखार यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक अभियंते वंजारी, माहुरे, मुंगुले तसेच जनमित्र थाटकर व नवघडे यांनी प्रसंगावधान राखून शनिवारी रात्री १ वाजता जीवाची पर्वा न करता पुराच्या पाण्यातून मार्गक्रमण करून किन्ही उपकेंद्रातील वीज पुरवठा बंद करून तेथे पुराच्या पाण्यात अडकलेले कार्यरत कर्मचारी यंत्रचालक व सुरक्षा रक्षक यांना सुखरूप ठिकाणी आणण्यात यश मिळविले.

टॅग्स :floodपूरriverनदी