शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

मूल एमआयडीसीकडे ग्रामपंचायतीचा लाखो रूपयांचा गृहकर थकीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2024 14:43 IST

विकासच खुंटला : मरेगाव आकापूर ग्रामपंचायतचे आर्थिक बजेट कोलमडले

शशिकांत गणवीर लोकमत न्यूज नेटवर्क भेजगाव : मूल तालुक्यात रोजगाराची निर्मिती होऊन बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे म्हणून तालुक्यातील मरेगाव आकापूर, चिमढा परिसरात औद्योगिक विकास महामंडळ यांनी १९४.२६ हेक्टर जागेत भूमी अधिग्रहण करून शासनाने ४७ भूखंड पाडले व भूखंड उद्योगाकरिता उपलब्ध करून दिले. उपलब्ध भूखंडावर सुरू असलेल्या कंपन्यांनी आपल्या हद्दीतील ग्रामपंचायतीला कर देणे बंधनकारक आहे. मात्र कंपनीने निर्मितीपासूनच ग्रामपंचायतच्या कर मागणी पत्राला केराची टोपली दाखवत आजतागायत कराचा भरणा केला नाही. 

परिणामी औद्योगिक विकास महामंडळाकडे लाखो रुपयांचे गृह कर थकले असून, ग्रामविकासात अडचणी निर्माण होत आहेत. औद्योगिक विकास महामंडळाच्या जागेवरील काही कंपन्या मरेगाव तर काही आक्कापूर ग्रामपंचायत अंतर्गत येतात मरेगाव ग्रामपंचायतचा जवळपास ४७ लाख रुपये तर आक्कापूर ग्रामपंचायतचे जवळपास २० लाख रुपये संबंधित कंपन्यांनी कर थकविला आहे. याबाबत ग्रामपंचायतींनी संबंधित कंपनीकडे कराचा भरणा करण्यासंबंधी पत्रव्यवहार केला आहे. मात्र कंपन्यांनी गृहकर थकीतच ठेवला आहे. मरेगाव, आक्कापूर या दोन्ही गावात एक ना अनेक समस्या आ वासून उभ्या आहेत.

महामंडळही उदासीनसन २०१९ च्या परिपत्रकानुसार संबंधित कंपनीकडून कर वसुलीचे अधिकार औद्योगिक विकास महामंडळाला दिले आहेत. त्यातील ५० टक्के रक्कम औद्योगिक विकास महामंडळ स्वतः परिसरातील सुविधा तर ५० टक्के निधी थेट ग्रामपंचायतला देण्याची तरतूद आहे. मात्र कर वसुलीसाठी औद्योगिक विकास महामंडळ उदासीन आहे. त्यामुळे कर वसुली होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

"कराचे मागणी बिल व पत्रव्यवहार दरवर्षी सुरू असून, गृहकर देण्यास कंपन्यांकडून टाळाटाळ होत आहे. लाखो रुपये थकल्याने ग्राम विकासावर परिणाम पडला आहे." - बी. टी. बारसागडे, सचिव ग्रामपंचायत मरेगाव

टॅग्स :MIDCएमआयडीसीchandrapur-acचंद्रपूर