शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

वनमंत्र्यांकडून प्रकल्पांची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2020 05:00 IST

चंद्रपूर येथील आपल्या एक दिवसीय दौऱ्यादरम्यान वनमंत्री संजय राठोड यांनी सर्वप्रथम सकाळी वन अकादमीला भेट दिली. चंद्रपूर येथील वन प्रशिक्षण संस्थेचे वन अकादमीमध्ये रूपांतर झाल्यानंतर चंद्रपूर येथे या संस्थेची निर्मिती करण्यात आली. वन अकादमी परिसरात वनवा व आपत्ती निवारण केंद्राची निर्मितीसुद्धा होणार आहे. पुण्याच्या यशदा या प्रशिक्षण संस्थेच्या धर्तीवर विदर्भातील महत्त्वपूर्ण प्रशिक्षण संस्था म्हणून वन अकादमी पुढे येत असून आज वनमंत्र्यांनी या अकादमीच्या कामकाजाबाबतची माहिती घेतली.

ठळक मुद्देवन अकादमी, बांबू संशोधन केंद्र व बॉटनिकल गार्डनचा आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यातील वनविभागाच्या अंतर्गत येणाऱ्या वन अकादमी, बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र, बॉटनिकल गार्डन या तीन मोठया प्रकल्पाची रविवारी राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी पाहणी केली. या तीनही प्रकल्पातील सुरू असलेली कामे व दुसऱ्या टप्प्यातील अपूर्ण कामे तसेच त्याबाबत असणाºया अडचणी अधिकाऱ्यांकडून त्यांनी जाणून घेतल्या.चंद्रपूर येथील आपल्या एक दिवसीय दौऱ्यादरम्यान वनमंत्री संजय राठोड यांनी सर्वप्रथम सकाळी वन अकादमीला भेट दिली. चंद्रपूर येथील वन प्रशिक्षण संस्थेचे वन अकादमीमध्ये रूपांतर झाल्यानंतर चंद्रपूर येथे या संस्थेची निर्मिती करण्यात आली. वन अकादमी परिसरात वनवा व आपत्ती निवारण केंद्राची निर्मितीसुद्धा होणार आहे. पुण्याच्या यशदा या प्रशिक्षण संस्थेच्या धर्तीवर विदर्भातील महत्त्वपूर्ण प्रशिक्षण संस्था म्हणून वन अकादमी पुढे येत असून आज वनमंत्र्यांनी या अकादमीच्या कामकाजाबाबतची माहिती घेतली. याठिकाणी वनविभागाशिवाय अन्य विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण दिले जाणार आहे. वन अकादमी ही एक स्वायत्त संस्था आहे. या इमारतीचे कामकाज जवळपास पूर्ण झाले असून या इमारतीच्या मार्फत कोणते प्रशिक्षण व कशा पद्धतीने कार्यवहन चालणार आहे, या संदर्भातील माहिती त्यांनी यावेळी घेतली. वन अकादमीच्या प्रशिक्षण व कार्यवहन संदर्भातील अहवाल सादर करण्याचे त्यांनी अधिकाºयांना सांगितले. या प्रशिक्षण संस्थेची संपूर्ण माहिती यावेळी या वन अकादमीचे संचालक अशोक खडसे यांनी दिली.त्यानंतर त्यांनी चिचपल्ली येथील बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राला भेट दिली. या प्रशिक्षण केंद्रामध्ये विविध अभ्यासक्रम सुरू झाले असून या अभ्यासक्रमाला असणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी बांबू प्रशिक्षण केंद्राचे संचालक राहुल पाटील यांनी ५ जानेवारी २०१७ पासून सुरू झालेल्या या केंद्राच्या वाटचालीचे महत्त्वाचे टप्पे सांगितले. या ठिकाणावरून महिला बळकटीकरणासाठी सुरू असलेल्या भाऊ युनिटच्या फलनिष्पत्तीबाबत यावेळी माहिती देण्यात आली.बॉटनिकल गार्डनला भेटशेवटच्या टप्प्यात त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये विसापूर येथे उभे राहत असलेल्या बॉटनिकल गार्डनची पाहणी केली. राष्ट्रीय वनस्पती संशोधन संस्था लखनऊ यांच्यामार्फत बॉटनिकल गार्डनच्या तांत्रिक कामात मदत होत आहे. फुलांचे निर्जलीकरण तंत्र व त्याबाबतचे प्रशिक्षण केंद्र हे या संस्थेच्या सहभागाचा मुख्य भाग आहे. तसेच सायकॅड हाऊस, हर्बेरियम, बीच संग्रहालय, बोन्साय गार्डन, कॅना गार्डन, बोगनवेलिया गार्डन, याबाबतची माहिती त्यांनी जाणून घेतली. या ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या रोपवन, निरीक्षण पथ, वॉच टॉवर, पूल, रस्ते, जलाशय आदी कामांची पाहणी केली. या प्रकल्पाची माहिती उपविभागीय वन अधिकारी गजेंद्र हिरे यांनी दिली. यावेळी प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) रामबाबु , प्रधान मुख्य वनसंरक्षक (नियोजन) साईप्रकाश, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक शैलेश टेंभुर्णीकर, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक वासुदेवन, अधिक्षक अभियंता सुषमा साखरवाडे, मुख्य वनसंरक्षक रामाराव उपस्थित होते.

टॅग्स :forestजंगल