शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अंगणात झोपलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग; आरोपीला तीन वर्षांचा कारावास

By साईनाथ कुचनकार | Updated: July 3, 2023 18:23 IST

तीन हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा, दंड न भरल्यास सहा महिन्याची अतिरिक्त शिक्षा

चंद्रपूर : घराबाहेर अंगणात झोपून असलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपी मनोज शंकर आडपेवार (३८) चंद्रपूर याला न्यायालयाने तीन वर्ष कारावास आणि तीन हजार रुपयाची शिक्षा तसेच दंड न भरल्यास सहा महिन्याची अतिरिक्त शिक्षा सुनावली आहे.

रामनगर पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या जलनगरमध्ये एक अल्पवयीन मुलगी अंगणामध्ये झोपून असताना आरोपी मनोज आडपेवार याने दारूच्या नशेमध्ये तिचा विनयभंग केला. ही घटना २५ फेब्रुवारी २०१९ रोजी घडली. घटनेनंतर मुलीच्या कुटुंबीयांनी रामनगर पोलिस स्टेशनध्ये तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर पोलिस उपनिरीक्षक अश्विनी वावडे यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. कोर्ट पैरवी म्हणून पोलिस उपनिरीक्षक शामराव पोईनकर, पंजाबराव मडावी यांनी काम बघितले.

दरम्यान, न्यायालयाने प्रकरणाची तपासणी तसेच साक्षीदारांची साक्ष नोंदवून आरोपी मनोज शंकर आडपेवार याला तीन वर्ष कारावास, तीन हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा तसेच दंड न भरल्यास सहा महिने अतिरिक्त सक्षम कारावासाची शिक्षा सुनावली. या प्रकरणीत सरकारी अभियोक्ता म्हणून ॲड. देशपांडे यांनी काम बघितले.

टॅग्स :Courtन्यायालयMolestationविनयभंगchandrapur-acचंद्रपूर