शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला वर्ल्डकप: आज घडणार इतिहास; प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका; उत्सुकता शिगेला
2
आजचे राशीभविष्य, ०२ नोव्हेंबर २०२५: हाती पैसा, यश-कीर्ती लाभेल; पण हट्टीपणा सोडावा
3
कसली थंडी..? आता अनुभवा ‘नोव्हेंबर हीट’! मुंबईसह राज्यभरात अवकाळी पावसाचीही शक्यता
4
आयोगाचा सर्व्हर कुणाच्या कार्यालयात? कुणाची नावे काढायची, कुठली टाकायची हा कट सुरू: ठाकरे
5
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
6
दुबार मतदार दिसताच बडवा; मविआ-मनसेचा महाएल्गार! मतदार यादीतील घोळाबाबत मुंबईत निषेध मोर्चा
7
गाव पोटा.. व्यवसाय शेती अन् वालेगावकर दाम्पत्याला मिळाला उपमुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान
8
‘तुमच्या विमानात आज १९८४ मद्रास स्टाईल बॉम्ब अटॅक होणार आहे’; मुंबईत इमर्जन्सी लँडिंग
9
२४ मोबाईल खेचणाऱ्या दोन आरोपींना अटक; आचोळेच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांची कामगिरी
10
ठेकेदारांचे कामबंद, हिवाळी अधिवेशन नागपूर की मुंबईत? बांधकाम खाते संभ्रमात
11
निर्भिड आणि बेधडक पत्रकारितेची आज गरज; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मत
12
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
13
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
14
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
15
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
16
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
17
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
18
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
19
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
20
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले

आधुनिकतेबरोबर मिळालेल्या सुखसोयी सुखकर की घातक?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 18:42 IST

पैसा कमविण्याच्या भानगडीमध्ये स्वत:च्या शरीराकडे अनेकजण दुर्लक्ष करीत आहेत. गरज नसतानाही वाहनांचा वापर केला जात आहे. परिणामी शारीरिक व्यायामच होत नसल्याने शरीरसंतुलन बिघडत असून स्थूलपणा येत आहे.

ठळक मुद्देचालण्याची सवय मोडली, नको त्या वयात गुडघे-कंबरदुखी लागलीजवळच्या कामांसाठीही वाहनांचा वापर

चंद्रपूर : आजकाल कामाचा व्याप वाढल्याने व्यक्ति मानसिकदृष्ट्या तणावात असतात. कामाचा व्याप, नको तो ताण, मोबाईल, संगणकवर बसून काम करणं, दिवसभर एकाच स्थितीत बसून राहणं यामुळे शरीरातील दुखणं वाढतं. त्यानंतर तिथेच जेवण आणि झोप हा प्रकार आजघडीला खूप वाढला आहे. याचा परिणाम थेट आपल्या तब्येतीवर होतो. अंगदुखी, डोळ्यांची जळजळ, थकवा, पाय दुखणे, गुडघेदुखी आदि समस्या जडतात. 

आधुनिकतेबरोबर प्रत्येकाच्या जीवनशैलीतही अनेक बदल झाले आहेत. जवळच्या दुकानात जायचे असो, की शेजाऱ्यांकडे जाणे असो, गाडी काढली की सर्व जण भुर्रर जातात. परिणामी चालण्याची सवयच आता मोडत आहे. कधी चालायची वेळ आलीच, तर दम लागतो, ठेचा लागतात, असे अनेकजण दिसतात. चालण्याची सवय नसल्याने अनेकांना नको त्या वयात गुडघे तसेच कंबरदुखीची व्याधी सुद्धा लागली आहे. त्यामुळे वेळीच सावध होऊन, घरी कितीही गाड्या असल्या तरीही, चालण्याची सवय ठेवणे अत्यावश्यकच आहे.

सध्या स्पर्धेचे युग आहे. त्यामुळे जो तो स्पर्धा करीत आहे. यामध्ये पैसा कमविण्याच्या भानगडीमध्ये स्वत:च्या शरीराकडे अनेकजण दुर्लक्ष करीत आहेत. गरज नसतानाही वाहनांचा वापर केला जात आहे. परिणामी शारीरिक व्यायामच होत नसल्याने शरीरसंतुलन बिघडत असून स्थूलपणा येत आहे. चालण्याचा सराव नसल्याने थोडे जरी अंतर चालले तरी, अनेकांना दम लागत आहे. त्यामुळे प्रकृती बिघडली की काय? असे प्रत्येकांना वाटते. एखाद्यावेळी गाडी बंद पडली, तर मग मोठीच अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे प्रत्येकाने चालण्याची सवय ठेवावीच. यामुळे स्वत:चे आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होईल, असा सल्ला तज्ज्ञ डाॅक्टरांनी दिला आहे.

या कारणांसाठी होतेय चालणे...

ज्येष्ठ : व्यायाम म्हणून सकाळ - सायंकाळ

महिला : किराणा किंवा रिक्षा मिळेपर्यंत

पुरुष : गाडी लावून घरात किंवा कार्यालयात जाईपर्यंत आणि केलीच तर शतपावली

तरुणाई : गल्लीतील मित्र-मैत्रिणींच्या घरापर्यंत

हे करून बघा...

एक कि.मी. परिसरापर्यंत गाडीचा वापर टाळा. कुठेही काम करताना सहकाऱ्याची मदत कमीत कमी घ्या.

घाई नसेल त्यावेळी तरी लिफ्टचा वापर टाळा.

...म्हणून वाढले हाडांचे आजार

प्रत्येक घरात आता दुचाकी आली आहे. काहींकडे चारचाकी वाहन आहे. बाजारात जाणे असो, की किराणा आणण्यासाठी, गाडी काढली की झटपट जाण्याची मानसिकता सध्या वाढली आहे. चालत भाजी आणायला जाणाऱ्यांची संख्याही कमी आहे. अपार्टमेंटमध्येही वरच्या मजल्यावर राहणारे तर पिशवी खाली सोडून त्यात साहित्य भरून ती वर खेचतात. शारीरिक कष्ट करण्याचा आळस ही चालण्याची सवय मोडत आहे.

असा होतो फायदा...

रस्त्याने चालत जाताना शारीरिक हालचाल होते. त्याबरोबरच चालत फिरण्याने परिसराची ओळख होते. ज्या भागात आपण राहतो तो परिसर, त्यातील गल्ली-बोळ माहीत असतील, तर एखाद्या प्रसंगाला सामोरे जाताना फार अडचण होत नाही. कित्येकांना गल्लीशेजारी असणारी महत्त्वाची दुकाने, ठिकाणे यांचीही माहिती नसते. पायी फिरताना ठळक खुणा आणि परिसराची माहिती होते. सोबतच शारीरिक व्यायामसुद्धा होतो.

चालण्याची सवय नसल्याने...

पायांच्या स्नायूंचा पुरेपूर वापर होताना दिसत नाही. नियमित उठ-बस करणे एवढ्यापुरतीच ही क्रिया मर्यादित राहते. दिवसभरातून किमान १५ मिनिटे सलग चालण्याचा व्यायाम करणे आवश्यक आहे. यामुळे शारीरिक व्यायाम होऊन शरीर सुदृढ राहण्यास मदत होईल.

- डाॅ. विनोद मुसळे

अस्थिरोग तज्ज्ञ, चंद्रपूर

टॅग्स :Healthआरोग्यSocialसामाजिक