शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

टाकाऊ साहित्यातून बनविलेले ‘आधुनिक फवारणी यंत्र’ ठरतेय फायदेशीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 12:04 IST

ग्रासरूट इनोव्हेटर : या यंत्राला पाठीवर किंवा खांद्यावर घ्यायची गरज नाही. 

- प्रा. अशोक डोईफोडे ( चंद्रपूर)

पारंपरिक फवारणी यंत्राने फवारणी करताना, शेतकऱ्यांना अनेक त्रासांना सामोरे जावे लागते. यात शारीरिक कष्ट तसेच आरोग्याचा प्रश्नही असतो. या सर्व बाबींचा विचार करून चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर  येथील महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयाच्या (एम.सी.व्ही.सी.) प्रा. माधुरी पेटकर यांनी टाकाऊ साहित्यापासून ‘आधुनिक फवारणी यंत्र’ तयार केले आहे. जे शेतकऱ्यांना अतिशय फायदेशीर ठरत आहे. या यंत्राला पाठीवर किंवा खांद्यावर घ्यायची गरज नाही. 

पारंपरिक फवारणी यंत्र सतत खांद्यावर घेऊन राहावे लागत असल्यामुळे खांदे निकामी होणे, मणक्याचा त्रास होणे, शरीरावर वजन येत असल्यामुळे आरोग्यावर दुष्परिणाम होत असतो. औषधीची टँक पाठीवर आणि नोझल नाकाजवळ असल्यामुळे घातक रसायने नाकाद्वारे शरीरात जातात. त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना विषबाधा झाली असून, काही जणांचा तर मृत्यूही झाला आहे. याशिवाय पारंपरिक फवारणी यंत्राची किंमतही अधिक आहे. साधा पंप दोन हजार रुपये, तर इलेक्ट्रिक पंपची किंमत तीन हजार ५०० रुपयांपर्यंत आहे. त्यामुळे हे पंप शेतकऱ्यांना परवडणारे नाही.

प्रा. पेटकर यांनी शोधलेल्या यंत्रामुळे शेतकऱ्यांच्या पाठीवर किंवा खांद्यावर ताण पडत नाही. शारिरीक कष्टही घ्यावे लागत नाही. टँक आणि नोझल मानसापासून लांब अंतरावर असल्यामुळे घातक रसायने शरीरात जात नाही. यात विशेष बाब अशी की, या यंत्रामध्ये एकापेक्षा जास्त नोझल वापरलेले असल्याने एकाच वेळी चार ते सहा सरींची सोयीस्करपणे फवारणी केली जाऊ शकते.. तसेच हे यंत्र तयार करण्यासाठी जास्तीत जास्त तीन हजार रुपये खर्च येतो. कमी किंमतीत वेळ व श्रम वाचविणारे हे यंत्र असून  शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरत आहे.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी