शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
3
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
4
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
5
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
6
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
7
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
8
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
9
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
10
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
11
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
12
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
13
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
14
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
15
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
16
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
18
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
19
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
20
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
Daily Top 2Weekly Top 5

एका मिस्ड कॉलने बंदुकीतून सुटतात चक्क सात गोळ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 00:06 IST

मोबाईलने जगात नवी क्रांती घडवून आणली आहे. संभाषण करणे एवढेच मार्यादित राहिले नसून चॅट करणे, व्हिडीओ पाठविणे याव्यतिरीक्त जगातले कानाकोपऱ्यातील ज्ञान घरबसल्या मोबाईलच्या कळ दाबताच पुढे येते.

ठळक मुद्देबालवैज्ञानिकाचा प्रयोग : भारतभूमीच्या रक्षणासाठी विक्रांतची ‘सोल्जरलेस गन’

मंगेश भांडेकर ।आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : मोबाईलने जगात नवी क्रांती घडवून आणली आहे. संभाषण करणे एवढेच मार्यादित राहिले नसून चॅट करणे, व्हिडीओ पाठविणे याव्यतिरीक्त जगातले कानाकोपऱ्यातील ज्ञान घरबसल्या मोबाईलच्या कळ दाबताच पुढे येते. हाच मोबाईल मिनी कम्प्युटरचेही काम करतो.एक पाऊल पुढे टाकत याच मोबाईलचा आधार घेत ब्रह्मपुरीच्या एका बालवैज्ञानिकाने मिस्ड कॉलवर चक्क सात गोळ्या सुटणारी ‘सोल्जरलेस गन’ बनविली. भारतभूमीच्या रक्षणार्थ सीमेवर तैनात जवानांसाठी ही बंदूक नवे बळ देणारी असल्याचे हा बालवैज्ञानिक सांगतो.देशाच्या सीमेवर पाकिस्तान तर गडचिरोली, छत्तीसगडच्या जंगलात नक्षलवाद्यांशी लढताना अनेक जवानांना वीर मरण येते. अशा घटना सतत घडत असून मोठी जिवितहानी होत आहे. ही जिवितहानी रोखण्यासाठी ब्रह्मपुरी येथील ख्रिस्तानंद महाविद्यालयातील इयत्ता अकरावीतील विज्ञान शाखेचा विद्यार्थी विक्रांत भाऊराव कुथे याने प्रा. सुशिल कावळे यांच्या मार्गदर्शनात सादर केलेली ‘सोल्जर लेस गन’ची प्रतिकृती जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात लक्ष वेधून घेत आहे.विक्रांतने प्रयोगाच्या माध्यमातून मांडलेली ‘एके-४७ सोल्जर लेस गन’ पूर्णपणे मानवविरहीत चालणारी आहे. विशेष म्हणजे, सीमा सुरक्षेसाठी जवानाची कोणतीही जीवतहानी न होता ही गन आपला जवान किंवा सामान्य नागरिक कोण, हे ओळखूनच शत्रूला बंदुकीच्या गोळीने कसे भेदता येईल, हे त्याने प्रयोगातून दाखविले आहे. बंदुकीच्या निशाण्यावर कुणीही आल्यास त्याचे क्लोजअप फोटो सेन्स करून ओळख पटविता येते. त्यामुळे शत्रूची ओळख पटताच गोळी झाडता येणे शक्य आहे. गोळी झाडल्यानंतर शत्रू ठार झाला किंवा नाही, हेही ओळखण्याची यंत्रणा या बंदुकीत आहे. ड्रोन वापरूनही या गनचा वापर करता येऊ शकतो.कंट्रोल रूममधून करता येते शत्रूला लक्ष्य‘सोल्जर लेस गन’ इलेक्ट्रो मॅग्नेटीव्ह व्हेबने रोटेड ६० डिग्री फिरून शत्रूचा लक्ष्य करते. ही गन कोणत्याही भूभागावर ठेवून वापर करता येणे शक्य आहे. या गनमध्ये विशेष प्रकारचे अ‍ॅप डाऊनलोड असलेला मोबाईल लावल्यानंतर जीपीएसद्वारे ट्रॅक करता येते. कंट्रोल रूममध्ये बसून गन ठेवलेल्या परिसरातील दूरवरच्या हालचाली पाहता येणार आहे. परिसरात शत्रू असल्यास मिस्ड कॉल देवून गोळी झाडता येते. एका मिस्ड कॉलने सात गोळ्या या गनमधून सुटतील.सोल्जर गनची वैशिष्ट्येया गनसाठी अत्यंत कमी खर्च येत असून हाताळणेही सोपे आहे. कोणत्याही भूभागावर ठेवून गनला दूरवरून कंट्रोल करता येवू शकते. ही गन दिवस असो किंवा रात्र २४ तास कंट्रोल रूममधून हाताळता येते. या गनमध्ये आणखी काही गोष्टी विकसीत करून रणांगणात वापरता येवू शकते, असे विक्रांतने ‘लोकमत’ला सांगितले.