शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

वेकोलिकडून प्रकल्पग्रस्तांची दिशाभूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 00:22 IST

बल्लारपूर वेकालि क्षेत्रांतर्गत पौनी २ व ३ कोळसा खाणीसाठी ७०० च्यावर शेतकºयांच्या जमिनी वेकोलि प्रशासनाने ताब्यात घेतल्या.

ठळक मुद्देनरेश पुगलिया यांचा आरोप : साखरी येथील उपोषणस्थळी भेट

लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : बल्लारपूर वेकालि क्षेत्रांतर्गत पौनी २ व ३ कोळसा खाणीसाठी ७०० च्यावर शेतकºयांच्या जमिनी वेकोलि प्रशासनाने ताब्यात घेतल्या. २०१२ च्या हस्तांतर कायद्यानुसार प्रकल्पग्रस्त शेतकºयांना मोबदला व नोकरी देण्याचे करारनाम्यात नमूद आहे. मात्र वेकोलि प्रशासन रेडीरेक्नरचा आधार घेत प्रकल्पग्रस्त शेतकºयांची दिशाभूल करीत आहे. प्रकल्पग्रस्तांवर अन्याय होऊ देणार नाही. वेळप्रसंगी न्यायालयाचे दार ठोठावले जाईल, असा इशारा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी खासदार नरेश पुगलिया यांनी मंगळवारी दिला.बल्लारपूर वेकोलि क्षेत्राच्या पौनी कोळसा खाण क्रमांक २ व ३ मधील प्रकल्पग्रस्त शेतकºयांनी १० आॅक्टोबरपासून बेमुदत उपोषण सुरु केले. मात्र वेकोली प्रशासन अद्यापही कुंभकर्णी झोपेत आहे. आंदोलनाला तीव्र करण्याच्या अनुषंगाने राजुरा तालुक्यातील प्रकल्पग्रस्त शेतकºयांनी न्याय मागण्याकडे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी साखरी येथे सभा घेतली. यावेळी मार्गदर्शन करताना नरेश पुगलिया बोलत होते.यावेळी शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष गजानन गावंडे, मनपा गट नेते डॉ. सुरेश महाकुलकर, जिल्हा परिषद सदस्य शिवचंद काळे, नगरसेवक अशोक नागापूरे माजी नगरसेवक प्रविण पडवेकर, देवेंद्र बेले, उमाकांत धांडे, साखरीचे सरपंच भाऊजी कोडापे, उपसरपंच अमोल घटे, शेषराव बोंडे, कैलास उरकुडे, कवडू पोटे, रामदास वाग्दरकर यांची उपस्थिती होती.यावेळी नरेश पुगलिया पुढे म्हणाले, केंद्र व राज्यातील भाजपाचे सरकार शेतकºयांच्या जीवावर उठले आहे. वेकालि एका एकर जमिनीतून २५ ते ३० कोटी रुपये किंमतीच्या कोळशाचे उत्खनन करते. करारनाम्यानुसार प्रकल्पग्रस्तांना एकरी सहा ते १० लाख रुपये मोबदला मिळणे क्रमप्राप्त आहे.मात्र वेकालि प्रशासन शेतकºयांच्या तोडाला पाने पुसण्याचा प्रकार करीत आहे. जमिनीच्या मालकाला देशोघडीला लावत आहे. न्याय मागण्या पदरात पाडून घेण्यासाठी शेतकºयांची एकजूट महत्त्वाची आहे.संघर्ष करण्यासाठी प्रकल्पग्रस्तांनी तयार राहावे, असेही त्यांनी सांगितले. सभेचे संचालन व आभार प्रदर्शन उत्तम बोबडे यांनी केले. यावेळी प्रकल्पग्रस्तांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.