शहरं
Join us  
Trending Stories
1
गजब होई गवा! महिलेच्या व्होटर आयडीवर छापला बिहारी मुख्यमंत्र्यांचा फोटो; पती म्हणतोय... 
2
तीन हजारांवर काॅटेज, हाॅटेलमध्ये ‘सर्च ऑपरेशन’; संशयास्पद ‘बोटी’च्या संदेशानंतर पोलिस ‘अलर्ट’
3
फेसबुक लाईव्हवर व्यथा सांगितली अन् १५ मिनिटांत संपवलं जीवन! रिअल इस्टेट व्यावसायिकानं का उचललं टोकाचं पाऊल? 
4
कंगाल पाकिस्तानबद्दल काय म्हणावं? पाकिस्तानची सरकारी एअरलाईन्स खरेदी करण्यासाठी आले सीमेंटवाले
5
पुढील काही महिने पृथ्वी वेगाने फिरणार; भविष्यात घड्याळाची वेळ बदलावी लागणार, ९ जुलैला काय घडलं?
6
रात्री ज्याला चोर म्हणून तुडवला, त्यालाच सकाळी जावई बनवला! रात्रभरात असं नेमकं घडलं काय? 
7
आजचे राशीभविष्य: या राशींसाठी लग्न जुळण्याचा योग, व्यापार - व्यवसायात फायदा होणार, चांगला दिवस
8
हातात हात अन् प्रेग्नंट पत्नीला साथ! शूराची काळजी घेताना दिसला अरबाज खान, व्हिडीओ व्हायरल
9
समलैंगिक संबंध, ब्लॅकमेलिंग अन् शेवट...; मुंबईतील ३ घटना, ३ मृत्यू, नेमकं काय घडले?
10
५० लाख नागरिकांना मिळणार जागेची मालकी; तुकडेबंदी कायदा तूर्त शिथिल, नंतर रद्द करणार
11
...तर खराब रस्त्यांसाठी नागरिकांनी या आमदारांना का मारू नये?; टॉवेल बनियनवर गावगुंडासारखा राडा
12
विद्यार्थिनींची अंतर्वस्त्रे उतरवली, कारण...; शहापूरच्या खासगी शाळेतील अत्यंत घृणास्पद प्रकार
13
सोळावं वरीस धोक्याचं... किशोरवयातच प्रौढपण; खेळण्याच्या वयात मुली पडतायेत वासनेचा बळी
14
मतदारांच्या कमाल संख्येनुसार मतदान केंद्रे; निवडणूक आयोगाचे निर्देश, एका इमारतीत आता १० केंद्रे
15
पंढरीचे ‘एआय’ वारकरी! AI ने केली २७ लाख लोकांची गर्दी मोजण्याची किमया
16
निवडणूक आयोग जनतेला मूर्ख समजतो की काय?; रोखठोक प्रश्न विचारणं आवश्यक बनलंय
17
महासंचालकांचे परिपत्रक सर्व पोलिसांवर बंधनकारक नाही का?; अपूर्ण केस डायरीवरून उच्च न्यायालय संतापले
18
मृत घोषित केलेले बाळ अंत्यसंस्कारावेळी रडले; अंबाजोगाईच्या रुग्णालयात धक्कादायक प्रकार
19
‘आई’ व्हा! शाळकरी मुलींनाही 'या' देशानं दिलं आमिष; मुलं जन्माला घातली तर मिळणार १ लाख
20
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...

रॉयल्टी न भरताच होते गौण खनिजांचे खनन

By admin | Updated: March 12, 2017 01:30 IST

रस्त्याच्या कामासाठी लागणारी गिट्टी व मुरूम घेताना परवाना घेण्यात यावा, असा उल्लेख अंदाज पत्रकावर

अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष +: महसूल विभागाला लाखोंचा फटका शंकर चव्हाण   जीवती रस्त्याच्या कामासाठी लागणारी गिट्टी व मुरूम घेताना परवाना घेण्यात यावा, असा उल्लेख अंदाज पत्रकावर असतानाही जवळच्याच डोंगर व नाल्यात खोदून विनापरवाना अवैध गिट्टी व मुरूमाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात असल्याचे लोकमतच्या स्टिंग आॅपरेशनदरम्यान दिसून आले. यातून शासनाचा महसूल बुडविला जात आहे. संबंधित विभाग याकडे कानाडोळा का करताहेत, कंत्राटदार व अधिकारी, कर्मचाऱ्यांचे साटेलोटे झाले की काय, अशी जोरदार चर्चाही परीसरात सुरू आहे लोकमत प्रतिनिधीने जीवती -केकेझरी या पाच कि.मी.रस्त्याच्या रूंदीकरणाच्या कामावर भेट दिली असता कंत्राटदार अति नफा कसा कमवितो, याचे बिंग फुटले. सदर रस्त्याच्या कामासाठी बांधकाम विभागाच्या अर्थसंकल्प योजनेतून पाच कोटी रूपयांचे बजेट मंजूर झाले. हे काम चंद्रपूरच्या एका नामवंत ठेकेदाराला देण्यात आले आहे. रस्ता रूंदीकरणाच्या कामाचे खोदकाम करून थोडीफार खडीमिशनवरील गिट्टी दाखविण्यापुरती आणुन ठेवली असून केलेल्या खोदकामात विना परवाना ५० ते ६० ब्रॉस अवैधरित्या गिट्टी वापरली आहे. गेल्या पंधरा दिवसापासून या रस्त्याचे काम सुरू आहे. रस्त्याच्या कामासाठी लागणारे सर्व साहित्य जवळपासच्या डोंगरातून किंवा नाल्यातून वडार लावून फोडले जात आहे. हा प्रकार येथेच नाही तर पहाडावरील घनपठार, येसापूर -पळसगुडा, शंकरलोधी, सोरेकासा-शंकरपठार, येरमीयेसापुर -महापांढरवणी, अशा अनेक ठिकाणच्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात अवैध गिट्टी व मुरूम वापरले असून महसुल विभागाला लाखो रूपयांचा चुना लावला जात आहे सदर रस्ता तयार करण्यासाठी अंदाजपत्रकावर खडीमिशनवरील गिट्टीचा वापर करणे असा उल्लेख केला असतानाही कंत्राटदार भरदिवसा अवैध गिट्टी व इतर साहित्य वापरतो कसा? त्यांच्यावर कारवाई का केली जात नाही. त्यांच्यात संगणमत तर झाले नाही ना? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. चोर सोडून संन्याशाला फाशी शासनाचे कर चुकवून कमी दरात रस्त्याच्या कामासाठी लागणारी गिट्टी व इतर साहित्य मोठ्या प्रमाणात वापरत असतानाही त्यांच्यावर कुठलीच कारवाई आतापर्यंत झाली नाही. त्या कामावर साहित्य पुरवठ्यासाठी लावलेल्या सुशिक्षित बेरोजगाराच्या ट्रॅक्टरवर मात्र कारवाई करून मोठ्या कंत्राटदाराची अधिकाऱ्यांकडून पाठराखण केली जात आहे. अशी होते करचुकवेगीरी रस्त्याच्या कामासाठी गिट्टी, मुरूम व इतर साहित्याची आवश्यकता असते आणि हे संपूर्ण साहित्य खडीमिशनवरील गिट्टी व इतर परवानाप्राप्त साहित्य वापराव,े असे अंदाज पत्रकावर उल्लेख केला आहे. मात्र हे परवानाप्राप्त साहित्य आणण्यासाठी त्यांना एका ब्रॉससाठी जवळपास तीन ते चार हजाराचा खर्च सहन करावा लागतो. हा सर्व खर्च टाळण्यासाठी अधिकाऱ्यांसोबत संगणमत करून कमी दरात अवैध गिट्टी व मुरूम वापरून करचुकवेगीरी करण्याचे प्रकार वाढत आहेत.