शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीची परराज्यात सात वेळा विक्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2020 04:01 IST

घरासमोर खेळत असलेल्या एका ११ वर्षीय अल्पवयीन मुलीला दहा वर्षापूर्वी गुंगीचे औषध देऊन हरियाणाला पळवून नेण्यात आले.

चंद्रपूर : घरासमोर खेळत असलेल्या एका ११ वर्षीय अल्पवयीन मुलीला दहा वर्षापूर्वी गुंगीचे औषध देऊन हरियाणाला पळवून नेण्यात आले. मागील दहा वर्षांच्या काळात तिची सातवेळा विक्री करुन लग्न लावून दिल्याचा विदारक प्रकार चंद्रपूर पोलिसांनी उघडकीसआणला. रामनगर पोलिसांनी पीडित मुलीची हरियाणातील फतेहबाद येथून सुटका करुन मंगळवारी दोघांना तर बुधवारी एका महिलेला अशा एकूण तीन आरोपींना ताब्यात घेऊन अटक केली आहे. सावित्री मुजुमदार (५५), जान्हवी राय (४२), गीता मुजुमदार असेअटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींना १० जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.२०१० रोजी घरासमोर खेळत असणाऱ्या मुलीला प्रसादामधून गुंगीचे औषध देऊन पळवून नेण्यात आले होते. जान्हवी नामक महिलेने तिला रेल्वेने हरियाणा येथे नेले. त्यानंतर तिची हरियाणातील एका महिलेच्या सहाय्याने १ ते दीड लाखांत विक्री करण्यात आली. अशाप्रकारे तिची सुमारे सात वेळा विक्री करुन लग्न लावून देण्यात आले. यातून अल्पवयातच तिच्यावर दोनदा मातृत्व लादण्यात आले. मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार पीडित मुलीच्या कुटुंबाने रामनगर पोलिसात दिली होती. शोध घेऊनही तिचा थांगपत्ता न लागल्यामुळे पोलिसांनी प्रकरणाची फाईल बंद केली. त्या मुलीवर अत्याचार सुरुच होते. तिने अनेकदा नराधमांच्या तावडीतून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती अपयशी ठरत होती. काही दिवसांपूर्वी तिला फतेहबाद येथे ठेवण्यात आले होते. यावेळी घरमालकाला तिच्या हालचालीवरुन संयश आला. त्याने आस्थेने तिची विचारपूस केली असता तिनेही संपूर्ण आपबिती त्यांना सांगितली. तिचे धक्कादायक वास्तव ऐकून त्यांना पाझर फुटला. त्यांनीची तिला मदतीचा हात दिला. त्यांनी स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने हे प्रकरण हरियाणा पोलिसांपर्यंत पोहचविले. हरियाणा पोलिसांनी चौकशी करून याबाबतची माहिती रामनगर पोलिसांना २ जानेवारी रोजी दिली. यानंतर रामनगर पोलिसांनी थेट हरियाणा गाठून त्या पीडिताला चंद्रपूरला आणले आणि तिच्या कुटुंबियांच्या स्वाधीन केले.>बेपत्ता मुलींची माहितीचंद्रपूर जिल्ह्यातून आजवरी किती मुली बेपत्ता झाल्या याची माहिती संकलीत करण्याचे काम पोलिसांनी सुरु केले असून आरोपींच्या चौकशीतून त्यांचा छडा लावण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक चंदा दंडवते यांनी दिली.