शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

मंत्रालयाचा जीआर बनावट ! राज्य शासनात उडाली खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2025 12:10 IST

Chandrapur : बनावट शासन निर्णय (जीआर) सोशल मीडियावर व्हायरल

राजेश मडावी लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : राज्याच्या पर्यटन व सांस्कृतिक मंत्रालयाकडून प्रादेशिक पर्यटन विकास योजनेची कोट्यवधींची कामे मंजूर केल्याचा एक बनावट शासन निर्णय (जीआर) सोशल मीडियावर व्हायरल झाला. या घटनेने राज्य शासनात खळबळ उडाली असून, जिल्हाधिकाऱ्यांनी त्यावर कोणतीही कार्यवाही करू नये, असे तडकाफडकी निर्देश गुरुवारी (दि. २३) जारी केले. राज्यातील सर्व नियोजन अधिकाऱ्यांनाही याबाबत अवगत केले आहे.

पर्यटन व सांस्कृतिक मंत्रालयाच्या प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत निर्गमित केले जाणारे सर्व शासन निर्णय पर्यटन विभागाच्या अधिकृत ई- मेल आयडीवरून संबंधित अधिनस्त कार्यालयांना पाठविले जातात; मात्र ६ ऑगस्ट २०२४ रोजी जारी झालेला एक शासन निर्णय सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना आढळून आले.

चौकशी केली असता तो शासन निर्णय अधिकृत ई-मेल आयडीवरून जारी केला नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर वेगवान हालचाली झाल्या अन् राज्य शासनाने गुरुवारी (दि. २३) तातडीने आदेश जारी केला आहे.

तीन जिल्ह्यांमुळे प्रकरण उघडकीस

  • बनावट जीआर नाशिक, धुळे व नंदुरबार जिल्ह्याशी संबंधित आहे. बनावट शासन निर्णयान्वये २४.०० कोटी रकमेस प्रशासकीय मान्यता दिल्याचे नमूद आहे; पण कामांची एकूण बेरीज केवळ १३,९७ कोटी होत आहे.
  • २०२४-२५ वर्षात पर्यटन विकास आराखडे वगळता कोणत्याही लहान कामांना २४.०० कोटी रकमेची प्रशासकीय मान्यता विभागाने दिली नाही. शासन निर्णयावरील स्वाक्षरी बनावट आहे.
  • दिलेल्या क्रमांकाची नस्ती तपासल्यानंतर असा शासन निर्णय जारी झाला नसल्याचे स्पष्ट झाले. आहरण व संवितरण अधिकारी व नियंत्रण अधिकारी म्हणून फक्त जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांनाच घोषित केल्याने प्रयत्न फसला.

"बनावट शासन निर्णयावर संबंधित कार्यालयाच्या अधिनस्त यंत्रणेकडून काही कार्यवाही झाली किंवा कसे याबाबत तपशीलवार चौकशी करून वस्तुस्थितीदर्शक अहवाल तत्काळ शासनास सादर करावा, असे निर्देश देण्यात आले आहेत." - संतोष रोकडे, उपसचिव पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, मुंबई

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूरGovernmentसरकार