शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
3
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
4
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
5
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
6
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
7
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
8
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
10
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
11
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
12
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
13
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
14
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
16
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
17
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
18
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
19
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
20
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!

दोन दिवसांच्या पावसामुळे लाखोंचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2018 22:44 IST

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : गुरुवारी आणि शुक्रवारी झालेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात घरांची पडझड झाली. दोघांना जीव गमवावा लागला. शेतकऱ्यांनी नुकतेच पेरलेले पऱ्हे वाहून गेले. प्रशासनाने नुकसानीचे सर्वेक्षण सुरू केले असले तरी नुकसानीचा आकडा लाखोंच्या घरात गेला आहे. गुरुवारी आणि शुक्रवारी पडलेला पाऊस जिल्ह्यात सर्वत्र होता. यासोबतच विदर्भातही संततधार ...

ठळक मुद्देसर्वेक्षण सुरू : अतिवृष्टीमुळे पिके वाहून गेली

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : गुरुवारी आणि शुक्रवारी झालेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात घरांची पडझड झाली. दोघांना जीव गमवावा लागला. शेतकऱ्यांनी नुकतेच पेरलेले पऱ्हे वाहून गेले. प्रशासनाने नुकसानीचे सर्वेक्षण सुरू केले असले तरी नुकसानीचा आकडा लाखोंच्या घरात गेला आहे. गुरुवारी आणि शुक्रवारी पडलेला पाऊस जिल्ह्यात सर्वत्र होता. यासोबतच विदर्भातही संततधार सुरू होती. त्यामुळे नदी-नाल्यांना अल्पावधीतच पूर आला. आणि पिकांचे, घरांचे मोठे नुकसान झाले.धान्य, भांडी वाहून गेलीवनसडी : कोरपना तालुक्यातील मोठी बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध असलेल्या वनसडी गावाला पावसाने चांगलेच झोडपले. शेतातील संपूर्ण पीक पाण्यामुळे भुईसपाट झाले. कित्येक शेतकऱ्यांच्या जमिनी पाण्यामुळे ओदून गेल्या. त्यात असलेले पीकसुद्धा पावसाने हिरावून नेले. शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तलाठीमार्फत शेतीचे पंचनामे करण्याचे आश्वासन दिल्याने आता किती, आणि केव्हा मदत मिळेल, हे निश्चितपणे सांगता येत नाही. पावसामुळे सुनंदा किशोर मोहीतकर यांचे घर पडले. सुदैवाने यात प्राणहानी झाली नाही. तसेच बल्की यांच्या घरात पाणी शिरल्याने धान्य भिजले व घरातील भांडी वाहून गेली. दत्तनगरातील छोटा - मोठा व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांचे संपूर्ण साहित्य वाहून गेले. शिवाय घरात नाल्याचे स्वरूप आल्याने गावकऱ्यांनी इतरत्र आश्रय घेतला.कोरपन्यात शेकडो घरांची पडझडकोरपना : तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शेतकºयांचे प्रचंड नुकसान झाले असून तालुक्यातील शेकडो घरांची पडझड झाली आहे. यामुळे अनेक लोक बेघर झाले असून शेतकºयांवर समस्यांचे आभाळ कोसळले आहे. तालुक्यातील नांदा, बिबी, आवाळपूर, गडचांदूर, कोरपना, वनसडी, लखमापूर, अंतरगाव, सांगोडा, करवाई, विरूर, गाडेगाव, वनोजा, नारंडा, आसन (खु.) आसन (बु.), धामणगाव, नैतामगुडा, गेडामगुडा, वडगाव, खिर्डी, इंजापूर, गोपालपूर, बैलमपूर, उपरवाही, कुकुडसात, थुटरा, हरदोना, कढोली, नवेगाव, निमणी, बाखर्डी, कवठाळा, भोयगाव, कोडशी (बु.), खोडशी (खु.), भोयगाव, एकोडी, बोरगाव, भारोसा, नांदगाव, जैतापुर, पिंपळगाव, पारडी, सावलहिरा, हिरापूर, मांगलहिरा, येरगव्हान, पिपर्डा, सोनुर्ली यासह इतर गावात शेतकऱ्यांचे व ग्रामस्थांचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकºयांच्या गोठ्यातील जनावरांचा चारा, घरातील धान्य इत्यादीही पाण्यात भिजवून खराब झाले आहे. तहसीलदार हरीश गाडे यांनी शुक्रवारी रात्री अनेक गावे फिरून मंडळ अधिकारी व तलाठी यांना नुकसानग्रस्त गावात जाऊन पंचनामा करण्याचे आदेश दिले. अनेक घरे जमीनदोस्त झाली असून कित्येक घरांच्या भिंती पडलेल्या आहेत. पावसामुळे अनेक गावांचा संपर्कसुद्धा तुटला होता.गोवरीत ३० घरांमध्ये पाणी शिरलेगोवरी : राजुरा तालुक्यातील गोवरी गावाला पुराचा चांगलाच तडाखा बसला. गावातील ३० घरात पुराचे पाणी शिरल्याने गावकऱ्यांची एकच तारांबळ उडाली. शुक्रवारी रात्री हा प्रकार घडला. त्यामुळे अनेकांना आपल्या घरातून साहित्य बाहेर काढणही कठीण झज्ञले तर काहींचे साहित्य पावसात पुर्णत: ओले झाले. वेकोलिच्या मातीच्या ढिगाºयाला पुराचे पाणी अडल्याने क्षणार्धात काही कळायच्या आत पुराचे पाणी गोवरी गावात शिरले आणि पाहता पाहता रात्री १ वाजताच्या सुमारास प्रचंड हाहाकार उडाला. गोवरी गावालगत मोठा नाला असल्याने संततधार पावसाने या नाल्याला पूर आला. पुराचा वेग एवढा जबरदस्त होता की अनेकांना आपल्या घरातील साहित्य आवरणे कठीण झाले. गोवरी मुख्य प्रवेशद्वाराजवळ असलेले मोठे लोखंडी फलक पाण्याच्या प्रचंड वेगाने भईसपाट केले तर मोठमोठी झाडे रस्त्यावर उन्मळून पडली होती. जि.प . शाळेच्या संरक्षण भिंतीला खरडून गेला तर राजुरा पोवणी मार्गावर गोवरी नाल्यावरील पुलावर पुरामुळे मोठे झाडे वाहून आल्याने तब्बल दोन तीन तास वाहतुकीचा खोळंबा झाला होता. पुराच्या प्रवाहाने गोवरी नाल्यावर असलेल्या पुलाबाजुला मोठा खड्डा पडल्याने धोका निर्माण झाला आहे. मातीच्या ढिगाऱ्याला पुराचे पाणी अडल्याने पुरस्थिती निर्माण झाल्याचे गावकºयांचे म्हणणे आहे. महिनाभरापूर्वीच दै.लोकमतने गोवरी गावाला पुराचा मोठा धोका होऊ शकतो, असे भाकीत वर्तविले होते. मात्र वेकोलिने याकडे दुर्लक्ष न दिल्याने गावकऱ्यांना पुराचा फटका बसला आहे. राजुरा तहसीलदार डॉ. रविंद्र होडी यांनी रात्रीच येउन पुरपरिस्थितीची पाहणी करून गावकऱ्यांना सतर्क राहण्याचे सुचना दिल्या होत्या.१२ शेळ्यांचा मृत्यूराजुरा तालुक्यातील चंदनवाही, एष्टा, हरदोना परिसरातही पुराचा चांगलाच तडाखा बसला. पुरात मुठरा येथे एका शेतकऱ्यांची बैलजोडी वाहून गेल्याची माहिती आहे. तर हरदोना येथील शेतकरी नरेश राजुरकर यांच्या शेतातील मांडव नाल्याला आलेल्या पाण्याने वाहून गेला. यात त्यांचे मोठे नुकसान झाले आहे तर पाचगाव येथे १२ शेळ्यांचा मृत्यू झाला.इरई धरणाचा जलस्तर वाढलादुर्गापूर : इरई धरणातील पाण्याचा तब्बल दोन मीटरचे स्तर उंचावला आहे. आजच्या घडीला २०२ - ४७५ मीटर पाण्याची पातळी आहे. उन्हाळा संपून पावसाळा सुरू झाला तरीही धरणातील पाण्याची पातळी झपाट्याने कमीच होत चालली होती. धरणाने २०० - २७५ एवढी निम्न पातळी गाठली होती. धरणाच्या बीकट स्थितीची सर्वत्र चिंता व्यक्त केली जात होती. दरम्रूान गुरूवारी रात्रीपासून संततधार पाऊस सुरू झाला. या दरम्यान पावसाने इरई धरणातील पाण्याचा स्तर उंचावण्याला सुरूवात झाली आणि धरणाची पातळी तब्बल दोन मीटरने वाढली.गडचांदुरात ४० घरांचे नुकसानगडचांदूर : गडचांदूरात प्रचंड नुकसान झाले असून ४० घरांमध्ये पाणी शिरल्याने धान्यासह घरातील अनेक वस्तू पाण्यात सापडल्या. गडचांदूर नगरपरिषद कर्मचाºयांनी शहरात फिरून पाहणी व पंचनामा केला. नुकसानग्रस्त त्वरित मदतीच्या अपेक्षेत आहेत. आसन येथील जि.प. शाळेची संरक्षण भिंतही कोसळली. सुदैवाने तिथे विद्यार्थी नसल्याने अनर्थ टळला.नागभीड येथे १५ घरांची पडझडनागभीड : शुक्रवारी झालेल्या पावसाने नागभीड तालुक्यात १५ घरांची पडझड झाली. यात आकापूर, आलेवाही, कोसंबी माल, कन्हाळगाव, तळोधी येथील प्रत्येकी एक, चारगाव चक व वाढोणा येथील प्रत्येकी दोन तर सावरगाव व पान्होळी येथील प्रत्येकी तीन घरांचा समावेश आहे. याचे सर्व्हेक्षण करण्यात आले आहे.