शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

वेकोलिच्या कोलस्टॉकमधील लाखोंचा कोळसा खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 00:36 IST

वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्राअंतर्गत येणाऱ्या सास्ती खुल्या कोळसा खाणीच्या कोल स्टॉकवर मागील १५ दिवसांपासून कोळशाची आग धगधगत असून वेकोलिचे मोठे नुकसान होत आहे. सोबतच येथे काम करणाऱ्या कामगारांना उन्हाच्या दहाकतेसोबत या आगीची दहकाताही सोसावी लागत असून त्यांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देसास्ती कोळसा खाण । १५ दिवसांपासून धगधगतेय आग, वेकोलिचे दुर्लक्ष

नितीन मुसळे।लोकमत न्यूज नेटवर्कसास्ती : वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्राअंतर्गत येणाऱ्या सास्ती खुल्या कोळसा खाणीच्या कोल स्टॉकवर मागील १५ दिवसांपासून कोळशाची आग धगधगत असून वेकोलिचे मोठे नुकसान होत आहे. सोबतच येथे काम करणाऱ्या कामगारांना उन्हाच्या दहाकतेसोबत या आगीची दहकाताही सोसावी लागत असून त्यांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. मात्र वेकोलि प्रशासन याकडे गंभीरतेने लक्ष देत नसल्याचे दिसून येत आहे.वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्राअंतर्गत राजुरा तालुक्यात सास्ती, गोवरी, पोवनी, साखरी, गोयेगाव याठिकाणी विविध कोळसा खाणी आहेत. मोठ्या प्रमाणात कोळसा उत्पादन घेतले जाते व खाणीतून काढलेला कोळसा हा कोलस्टॉकवर साठविला जातो. साठविलेल्या या कोळशाला उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात आगी लागतात. त्यावर उपाय म्हणून पाणी शिंपडले जाते. त्यामुळे आगीवर नियंत्रण करता येते.सास्ती खुल्या कोळसा खाणीच्या कोलस्टॉवर मागील १५ दिवसांपासून अशीच आग धगधगत असून त्यावर नियंत्रण करण्यात वेकोलि प्रशासन अपयशी ठरत आहे.पाण्याची पातळी खालावलीकोळसा खाणीमुळे परिसरातील तापमानात दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. कोळसा खाणीमुळे पाण्याची पातळीही मोठ्या प्रमाणात घटली असून पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. वेकोलिच्या कोळसा खाणीतून निघणाऱ्या धुरामुळे, अशा आगीमुळे तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होत असून परिसरातील सास्ती, धोपटाळा, गोवरी, पोवनी, साखरी गोयेगाव चार्ली, निर्ली, बाबापूर, मानाली, कढोली, माथरा, रामपूरसह इतर गावांना त्रास सहन करावा लागत असल्याची खंत या गावातील नागरिकांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली आहे.सास्ती-गोवरी परिसरात वेकोलिच्या कोळसा खाणी नव्हत्या. त्या काळात उन्हाळ्यात नाल्यात पाणी राहत होते. आज जनावरांनाही पिण्यासाठी पाणी नाही. पूर्वीपेक्षा तापमानातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. वेकोलिच्या धुळीमुळे व कोळशाच्या आगीमुळे तापमान वाढले आहे. सकाळी १० वाजतापासूनच उन्हाची दाहकता जाणवत आहे. शेतात काम करणे कठीण होत आहे. जनावरांचेही हाल होत आहे.-भास्कर लोहे, जेष्ठ नागरिक, गोवरी

टॅग्स :fireआग