शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

झाडीतील हजारो मजुरांचे रोजगारासाठी स्थलांतर; मजुरांचे जत्थे नागपूर, वर्धा, वाशिमकडे रवाना

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2024 14:28 IST

Chandrapur : विधानसभेच्या मतदानावर मोठा परिणाम होण्याची शक्यता

घनश्याम नवघडे लोकमत न्यूज नेटवर्क नागभीड : पुरेसे काम उपलब्ध नसल्याने झाडीपट्टीतील मजुरांचे स्थलांतर सुरू झाले आहे. दिवाळीसाठी हे मजूर गावाकडे येत असले, तरी दिवाळीनंतर पुन्हा कामावर जात असल्याने यावर्षीच्या विधानसभेच्या मतदानावर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

पूर्व विदर्भात नागपूर आणि चंद्रपूर या जिल्ह्यांचा समावेश होत असला, तरी चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड, ब्रम्हपुरी, सावली आणि सिंदेवाही या तालुक्यांना झाडीपट्टी म्हणून संबोधण्यात येते. झाडीपट्टीतील मुख्य आणि एकमेव पीक धानाचे असून, याच एका पिकावर झाडीपट्टीची अर्थव्यवस्थाही अवलंबून आहे. मात्र, हे धान पीक झाडीपट्टीतील मजुरांना पुरेसा रोजगार उपलब्ध करून देऊ शकत नसल्याने झाडीपट्टीतील मजूर दरवर्षीच रोजगारासाठी चापळीत म्हणजे नागपूर जिल्ह्यात स्थलांतर करीत असतात. काही मजुरांचे जत्थे तर वर्धा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांत जातात, अशी माहिती आहे. 

उलट वरील जिल्ह्यात बहुपीक पद्धती रूढ आहे. या जिल्ह्यात सोयाबीन, कापूस, मिरची, धान यांसारखे विविध पीक घेतले जातात. मात्र, तेथे उपलब्ध असलेल्या पीक व शेतीनुसार मजूर उपलब्ध होत नसल्याने या जिल्ह्यातील शेतकरी दरवर्षीच झाडीतील मजुरांना कामासाठी बोलवत असतात. 

सध्या सोयाबीन काढण्याचे काम सुरू झाले. सोयाबीन सवंगण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मजुरांची आवश्यकता असल्याने अनेक मोठे शेतकरी ओळखीच्या मजुरांकडे निरोप देऊन गेले. या निरोपांवरून नागभीड, ब्रम्हपुरी, सिंदेवाही तालुक्यातील शेकडो मजूर उमरेड, भिवापूर तालुक्यात सोयाबीन सवंगण्यासाठी रवाना झाले आहेत. कापूस आणि मिरचीचा हंगाम सुरू झाला की, असेच मजूर या हंगामासाठी नेहमीच जात असल्याचे दिसून येते. 

वाहनांचीही सोय ज्या मजुरांना मुक्कामी राहणे शक्य नाही, अशा मजुरांसाठी वाहनांचीही सोय करण्यात येत आहे. हे मजूर या वाहनांनी ये-जा करीत आहेत. काही गावांत, तर मजुरांची ने-आण करणारी वाहनेच तयार झाली हे शक्यतो भिवापूर, उमरेड तालुक्यापर्यंत मजुरीसाठी जात असतात.

मतदानावर पडणार फरक रोजगारासाठी स्थलांतर केलेले हे मजूर दिवाळीसाठी घरी येत असतात. मात्र दिवाळी झाली की, पुन्हा त्यांचे स्थलांतर सुरु होते. यावेळी स्थलांतराची गती थोडी अधिक असते, जे आहेत, तेही शतकारी स्वतःच्या अलापधारका आज ही रोजगारासाठी स्थलांतर करीत असतात.

अपघात होतात तरीही... मजुरांची ने ने-आण करणाऱ्या वाहनांचे अनेकदा अपघात झाले आहेत. सात महिन्यांपूर्वी उमरेड तालुक्यात झालेल्या अपघातात ब्रह्मपुरी तालुक्यातील माहेर येथील ४ महिलांचा जागीच मृत्यू झाला होता, तर याच आठवड्यात नागभीड तालुक्यातील डोंगरगाव येथील एक महिला ठार, तीन महिला गंभीर जखमी झाल्या. त्यांच्यावर नागपूर येथे उपचार सुरू आहेत. अशा घटना डोळ्यादेखत घडूनही पोटाची खळगी भरण्यासाठी अशी जोखीम पत्करावी लागत आहे.

टॅग्स :Migrationस्थलांतरणchandrapur-acचंद्रपूर