शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
2
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
3
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
4
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
5
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
6
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
7
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
8
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
9
कोकणात आणखी सहा ग्रोथ सेंटर्स; १०६ गावांत विकास केंद्रे, पर्यटन, कृषी व्यवसायाला चालना   
10
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
11
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
12
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
13
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
14
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
15
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
16
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
17
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
18
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
19
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
20
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक

काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत आज मेळावे, रॅली

By admin | Updated: October 8, 2016 00:46 IST

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण आणि माजी केंद्रीय मंत्री मुकूल वासनिक यांच्या ....

विविध प्रश्नांवर धरणे आणि मोर्चा : राजुऱ्यात कार्यकर्ता मेळावाचंद्रपूर : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण आणि माजी केंद्रीय मंत्री मुकूल वासनिक यांच्या ८ आॅक्टोबरच्या चंद्रपूर दौऱ्याच्या निमीत्ताने काँग्रेसमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. नागपुरातील विराट मोर्चानंतर प्रथमच माजी खासदार नरेश पुगलिया यांनी चंद्रपुरातून राज्य सरकारच्या विरोधात हाक दिली आहे. विदर्भ किसान मजदूर काँग्रेसच्या वतीने आयोजित केलेली रॅली आणि या रॅलीतून राज्य सरकारविरोधात फुंकला जाणारा असंतोषाचा बिगूल राजकीयदृष्ट्या महत्वाचा मानला जात आहे. प्रदेशाध्यक्ष म्हणून कार्यभार स्विकारल्यावर अशोक चव्हाण यांचा हा पहिलाच चंद्रपूर दौरा आहे. त्यामुळे अलिकडे काहीश्या मरगळलेल्या वातावरणानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्येही चैतन्याचे वातावरण दिसत आहे. या दौऱ्याच्या निमीत्ताने चंद्रपूर, राजुरा या दोन ठिकाणी जंगी कार्यक्रमांची आखणी झाली आहे. महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या तोंडावर झालेले हे आयोजन राजकीयदृष्ट्या चर्चेचे ठरत आहे.माजी खासदार नरेश पुगलिया यांनी राज्य सरकारविरोधात विविध प्रश्नांवर स्थानिक गांधी चौकात या दिवशी दिवसभर धरणे आयोजित केले आहे. सकाळी ११ वाजता प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत विदर्भ किसान मजदूर संघाच्या पुढाकारात रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. ्रजिल्हाधिकारी कार्यालयावर ही रॅली पोहचून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य सरकारला विविध मागण्यांचे निवेदन दिले जाणार आहे. यात विविध स्तरातील नागरिक आणि काँग्रेस कार्यकर्ते सहभागी होत आहेत. राजुरा तालुका काँग्रेस कमेटीच्या वतीने माजी आमदार सुभाष धोटे यांच्या पुढाकारात दुपारी १२ वाजता महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयाच्या प्रांगणात काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. अध्यक्षस्थानी प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण असून माजी केंद्रीय मंत्री मुकूल वासनिक यांच्या हस्ते या मेळाव्याचे उद्घाटन होत आहे. विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, विधानसभा उपगटनेते आमदार विजय वडेट्टीवार, माजी मंत्री राजेंद्र मुळक, बाबूराव तिडके, माजी आमदार प्रभाकरराव मामुलकर, एस. क्यू. जामा आदींची यावेळी प्रामुख्याने उपथिती राहणार आहे. याच दरम्यान, राजुरा नगरपालिकेने आयोजित केलेल्या विविध विकासकामांचे भूमिपूजनही काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या हस्ते होणार आहे. याच दिवशी सायंकाळी ४.३० वाजता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने चंद्रपुरातील दाताळा रोडवरील बाजार समिती परिसरात शेतकरी व महिला बचतगट मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याचे उद्घाटन माजी केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक यांच्या हस्ते आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे. विधान परिषद उपसभापती माणिकराव ठाकरे तसेच आमदार विजय वडेट्टीवार व माजी आमदार सुभाष धोटे मार्गदर्शन करणार आहेत. मेळाव्याला नागरिकांनी उपस्थित राहण्याची विनंती जिल्हा बँक अध्यक्ष मनोहर पाऊणकर व बाजार समितीचे सभापती दिनेश चोखारे यांनी केली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)