लोकमत शुभवार्तामूल : सतत चालणारी वाहनाची रेलचेल, जवळच पोलीस स्टेशन, पोस्ट आॅफिस, गुजरी यापुढे लोकांची गर्दी बघता सर्व सामान्य नागरिकांना निवांतपणे बसण्यासाठी काहीच उपलब्ध नसल्याचे हेरुन येथील नगरसेवक प्रशांत समर्थ व मित्र परिवारांनी बैठक निवारा उपलब्ध करून दिला. हा निवारा नागरिकांसाठी फलदायी ठरत असल्याचे दिसून येत आहे.नगर परिषद मूल अंतर्गत येणाऱ्या प्रभाग २ ची वस्ती ही दाट वस्ती असल्याने निवांतपणे घालविण्यासाठी मोकळी जागा नाही. या मार्गावरुन सोमनाथकडे जाणाऱ्या सतत वाहनाने सारा परिसर दिवसभर कर्कश आवाजाने गजबून जातो. जवळच पोलीस स्टेशन, पोस्ट आॅफीस, बँका, किराणा दुकान आणि विशेषत: रोज गुजरी यापुळे दरदिवशी या मार्गावर सततची गर्दी असते. निवांतपणे बसण्यासाठी मोकळी जागा उपलब्ध नसल्याने नागरिकांची कोंडी होताना दिसत होती. हे हेरुन येथील दरार दुर्गा मंडळाचे संचालक प्रशांत समर्थ तथा मित्र परिवारांनी ‘बैठक निवारा’ ची योजना आखली. या योजनेला मूर्त स्वरुप देण्याचा प्रयत्न करण्यात आला. पाच आसनाच्या खुर्च्या व वरचा शेड तयार करुन नागरिकांच्या सेवेसाठी ‘बैठक निवारा’ लोकार्पण करण्यात आला. राजकारणापेक्षा सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा प्रयत्न प्रशांत समर्थ व त्यांच्या मित्र परिवारांनी केला आहे. वर्षभरात विविध सामाजिक उपक्रम राबवित असल्याने नागरिकांना त्याचा फायदा होत असून अनेकांनी या उपक्रमाचे कौतूक ेले आहे. (तालुका प्रतिनिधी)
‘बैठक निवारा’ ठरला नागरिकांसाठी ‘फलदायी’
By admin | Updated: August 5, 2015 01:08 IST