शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

शहर फेरीवाला समितीची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 22:37 IST

शहरातील फेरीवाल्यांच्या समस्या सोडविण्यासाठी तसेच ‘फेरीवाला क्षेत्र' निश्चित करण्यासाठी त्यांची महानगरपालिकेकडे नोंदणी होणे आवश्यक आहे. सर्वेक्षण बंद झाल्यावर कुठलाही लाभार्थी योजनेपासून वंचित राहू नये, यासाठी येत्या दोन महिन्यात फेरीवाल्यांनी पालिकेकडे नोंदणी करावी.

ठळक मुद्देआयुक्त : फेरीवाल्यांनी महानगरपालिकेकडे नोंदणी करावी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शहरातील फेरीवाल्यांच्या समस्या सोडविण्यासाठी तसेच ‘फेरीवाला क्षेत्र' निश्चित करण्यासाठी त्यांची महानगरपालिकेकडे नोंदणी होणे आवश्यक आहे. सर्वेक्षण बंद झाल्यावर कुठलाही लाभार्थी योजनेपासून वंचित राहू नये, यासाठी येत्या दोन महिन्यात फेरीवाल्यांनी पालिकेकडे नोंदणी करावी. तसेच आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून बायोमेट्रिक नोंदणीस सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिका आयुक्त संजय काकडे यांनी शहर फेरीवाला समितीच्या बैठकीत केले.चंद्रपूर शहर महानगरपालिकेत शहर फेरीवाला समितीची बैठक बुधवारी आयुक्त संजय काकडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाचे आदेश तसेच केंद्र सरकारच्या कायद्यानुसार, चंद्रपूर शहर महानगरपालिकेद्वारे राष्ट्रीय फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. याअंतर्गत शहरी फेरीवाल्यांचे सर्व्हेक्षण करणे, त्यांना ओळखपत्र वाटप, शहर फेरीवाला आराखडा तयार करणे, फेरीवाला क्षेत्रासाठी आवश्यक पायाभूत सुविधांचा विकास करणे इत्यादींचा समावेश आहे. फेरीवाला धोरणाच्या प्रभावी व योग्य अंमलबजावणीसाठी आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली ३० सदस्यीय शहर फेरीवाला समिती गठीत करण्यात आली आहे. ज्यात महानगरपालिका प्रतिनिधी, पोलीस, वाहतूक पोलीस, सामाजिक संघटना, यासह ४० टक्के फेरीवाले प्रतिनिधींचा समावेश आहे.महानगरपालिकेने नेमलेल्या त्रयस्थ एजंसीद्वारे फेरीवाल्यांच्या जागेवर जाऊन अ‍ॅप आधारित सर्व्हेक्षण करण्यात येत आहे. नगरपरिषद प्रशासन संचानालयाने तयार केलेल्या आधारकार्ड आधारित मोबाइल अ‍ॅप सॉफ्टवेअरद्वारे सर्वेक्षण करण्यासह बायोमेट्रिक नोंदणी करण्याचा उपक्रम शहरात राबविण्यात येत आहे. यानुसार सर्व फेरीवाले, पथविक्रत्यांकडे आधारकार्ड असणे बंधनकारक आहे. तसेच सध्या चालू असलेला मोबाइल क्रमांक हा आधारकार्डशी जोडलेला असणे आवश्यक आहे. फेरीवाल्यांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण होताच फेरीवाल्यांना, विक्रेत्यांना ओळखपत्र दिले जाणार आहेत.