वलनी येथील वॉर्ड क्र. ३ च्या नवीन वाढीव वस्तीला पाणीपुरवठा योजना, रंजित नरुके ते राजू गुंधी ते पुनगीर पवार यांच्या घरापर्यंत अंतर्गत सिमेंट काँक्रिट रस्ता बांधकामाकरिता दहा लाख रुपये खासदार निधीअंतर्गत मंजूर करण्यात यावे यांसह अन्य मागण्यांचा निवेदनात समावेश आहे. शिष्टमंडळात होमदेव मेश्राम, प्रेमदास राठोड, दिलदार बारड, पिंकी बारड, सरिता राठोड,अंगराज पर्वते, सागर मेश्राम उपस्थित होते.
दरम्यान, खासदार नेते यांनी वाढीव पाणीपुरवठा योजना व रस्ता बांधकामाकरिता खासदार निधीअंतर्गत दहा लाख रुपयांचा निधी लवकरात लवकर मंजूर करू, असे आश्वासन दिले.