शहरं
Join us  
Trending Stories
1
Maratha Morcha Mumbai: मनोज जरांगेंना दिलासा, पण एका दिवसाचाच! पोलिसांचा निर्णय काय?
2
भारतावरील 'टॅरिफ' रशियन तेलामुळे नाही, तर ट्रम्प यांच्या नाराजीमुळे; अमेरिकन कंपनीचा दावा
3
'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं
4
मुंबईतील 'या' ठिकाणी लोक पैसे देऊन तासभर रडतात, प्रवेशासाठी होते गर्दी; काय आहे रुईकात्स?
5
Asia Cup 2025 : सिंग इज किंग! हरमनप्रीतची हॅटट्रिक; अखेरच्या टप्प्यात चीनचा करेक्ट कार्यक्रम
6
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मराठ्यांना आरक्षण देऊन टाकावं, मनं जिंकण्याची हीच संधी : मनोज जरांगे-पाटील
7
"मला माझ्या नवऱ्यापासून वाचवा..."; महिलेने कारमधून मारली उडी, रस्त्यावरच घातला गोंधळ
8
"नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका
9
चांद्रयान-5, तंत्रज्ञान , हायस्पीड रेल्वे अन् 10 ट्रिलियनची गुंतवणूक...भारत-जपानमध्ये १३ करार
10
सरिता हिची आत्महत्या नव्हेतर हत्याच... पती पुरुषोत्तम खानचंदानी यांचा आरोप
11
पंतप्रधान मोदींना जपानमध्ये मिळाली 'दारुम डॉल'; काय आहे या बाहुलीचा भारताशी संबंध?
12
"१९९१ मध्ये फसवणूक करूनच..."; सिद्धरामय्यांच्या एका विधानानं काँग्रेच्या 'मतचोरी' प्रकरणाची 'लंका' लावली; भाजपला मिळाला आयता मुद्दा!
13
राहुल गांधींना बदनाम करण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाईल; संजय राऊतांची टीका
14
मनोज जरांगे-पाटील यांना तात्काळ अटक करा; गुणरत्न सदावर्तेंची पोलीस महासंचालकांकडे मागणी
15
एअरपोर्टवर तरूणीच्या सामानाचं झालं 'चेकिंग'; पोलिसांनी बॅग उघडताच बसला धक्का.. आत काय निघालं?
16
बापरे! कच्च्या कांद्यामुळे आरोग्याचं मोठं नुकसान; समजल्यावर खाण्यापूर्वी कराल १०० वेळा विचार
17
'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा टीझर प्रदर्शित, वरुण धवन दिसला बाहुबली अवतारात
18
मुलीने बॉयफ्रेंडशी लग्नाचा तगादा लावला, बापाने लेकीचा आवाज बंद केला; मृतदेह लटकवून वेगळाच बनाव रचला 
19
ट्रम्प टॅरिफच्या संकटातही भारताची आर्थिक गाडी सुस्साट! GDP च्या वाढीत चीनलाही टाकलं मागे
20
पंक्चरचं दुकान अन् व्यवसायानं ड्रायव्हर; पंतप्रधान मोदींना शिवीगाळ करणारा तो' कोण?

‘लॉकडाऊन’ काळातही एचआयव्ही रूग्णांच्या घरी औषधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2020 05:00 IST

थेट रूग्णांच्या घरी औषधी पोहचवण्याचे आव्हानात्मक काम संकल्प बहुउद्देशीय ग्राम विकास संस्थाद्वारा संचालित लिंक वर्कर प्रकल्प, नोबल शिक्षण संस्था, जनहिताय मंडळ, संबोधन ट्रस्टने स्वीकारले. लॉकडाऊन काळात सुमारे दीडहजार रूग्णांपर्यंत तीन महिन्याची औषधी पोहचवली. परजिल्ह्यातील १३५ रूग्ण व वणी ग्रामीण रूग्णालयातील २०० एचआयव्ही रूग्णांना औषधी दिली.

ठळक मुद्देहजारो कुटुंबीयांंना दिलासा : जिल्हा एड्स नियंत्रण कक्षाचे कौतुकास्पद नियोजन

राजेश मडावी ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : लॉकडाऊनमुळे शहरे व गावे बंदिस्त होताच एचआयव्ही रूग्णांच्या छाती धडकी भरली. हे रूग्ण दर महिन्याला जिल्हा सामान्य रूग्णालय व उपजिल्हा रूग्णालयाच्या एसआरटी केंद्रातून औषधी घ्यायचे. कोरोना विषाणूविरूद्ध संपूर्ण आरोग्य यंत्रणेकडून झुंज सुरू असतानाच संभाव्य धोका ओळखून जिल्हा एड्स नियंत्रण कक्षाचे कौतुकास्पद नियोजन केले. शेकडो लिंक वर्करने जीवाची पर्वा न करता सुमारे दीडहजार एचआयव्ही रूग्णांच्या घरी जाऊन औषधी पोहोचवली.लॉकडाऊनमुळे जिल्ह्यातील १ हजार ५०० रूग्णांना जिल्हास्तरावरील एसआरटी केंद्रातून औषधी घेण्याचे मार्ग बंद झाले होते. त्यामुळे जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. राठोड यांच्या मार्गदर्शनात व जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्षाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी सुमंत पानगंटीवार यांच्या नेतृत्वात बैठका घेऊन एक्शन प्लॉन तयार करण्यात आला. लगेच एआरटी औषधांचा कालावधी संपणाऱ्या रूग्णांची यादी बनवून तालुकास्थळी औषधी पोहचवण्याची तयारी सुरू केली. त्यानंतर एकात्मिक सल्ला व तपासणी केंद्र तसेच स्वयंसेवी संस्थांनी मोबाईलद्वार ेरूग्णांशी संपर्क साधला. आयसीटीसी समुपदेशकांनी तालुक्यातील रूग्णांना औषधी मिळावी, यासाठी सकाळी ९ ते सायंकाळी ५ निरंतर सेवा दिली. मात्र, जे रूग्णालयात येऊ शकत नाही, अशापर्यंत औषध पोहचविणे हे सर्वात आव्हानात्मक काम होते. सर्व आईसीटीसी समुपदेशक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ व अन्य १३० कर्मचाऱ्यांनी एक्शन प्लॉन यशस्वी करून दाखविला. यासाठी एआरटीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. दिलीप मडावी, डॉ. श्रीकांत जोशी, जिल्हा पर्यवेक्षक निरंजन मंगरूळकर,लिंक वर्कर प्रकल्पाचे रोशन आकुलवार, संगिता देवाळकर आदींची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली होती.स्वयंसेवी संस्थांची तत्परताथेट रूग्णांच्या घरी औषधी पोहचवण्याचे आव्हानात्मक काम संकल्प बहुउद्देशीय ग्राम विकास संस्थाद्वारा संचालित लिंक वर्कर प्रकल्प, नोबल शिक्षण संस्था, जनहिताय मंडळ, संबोधन ट्रस्टने स्वीकारले. लॉकडाऊन काळात सुमारे दीडहजार रूग्णांपर्यंत तीन महिन्याची औषधी पोहचवली. परजिल्ह्यातील १३५ रूग्ण व वणी ग्रामीण रूग्णालयातील २०० एचआयव्ही रूग्णांना औषधी दिली. विहान प्रकल्प अंतर्गतही औषधी वाटप व आवश्यक मदत केली.लॉकडाऊन संपेपर्यंत कार्य निरंतर सुरू राहणार आहे. एकाही एचआयव्ही रूग्णाला औषधीविना राहावे लागणार नाही, यांची खबरदारी घेतली जात आहे.-सुमंत पानगंटीवार, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, डापकू, चंद्रपूर

टॅग्स :HIV-AIDSएड्स