शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

‘चांदा ते बांदा’ या म्हणीचा असा झाला प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 23:01 IST

भारताचा या टोकापासून त्या टोकापर्यंतच्या उत्तर-दक्षिण उल्लेख करताना हिमालय ते कन्याकुमारी असे आपण म्हणत असतो. त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचा या टोकापासून त्या टोकापर्यंतचा विस्तार उल्लेखताना चांदा ते बांदा असे राज्यात सर्वत्र म्हटले जात असते.

ठळक मुद्देचांदा म्हणजे आताचे चंद्रपूर : चांदा ते बांदा नावाने शासनाची योजनाही आली

वसंत खेडेकर ।लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : भारताचा या टोकापासून त्या टोकापर्यंतच्या उत्तर-दक्षिण उल्लेख करताना हिमालय ते कन्याकुमारी असे आपण म्हणत असतो. त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचा या टोकापासून त्या टोकापर्यंतचा विस्तार उल्लेखताना चांदा ते बांदा असे राज्यात सर्वत्र म्हटले जात असते. आता, चांदा आणि बांदा ही दोन शहर नेमकी कुठे व त्या शहरांचा नवीन जुना इतिहास काय, हे जाणून घेउ या! चांदा अर्थात चंद्रपूर हे जिल्ह्याचे मुखालय असलेले शहर विदर्भात, राज्याच्या एका टोकाला तेलंगणा सीमेच्या जवळ आहे. गोंडवंशीय राजांनी या भागावर सुमारे ६०० वर्षे राज्य केले. बल्लारशाह (बल्लारपूर) चा शेवटचा राजा खांडक्या बल्लारशाह यांनी चंद्रपूर शहर बसविले. या शहराचे प्रारंभीचे नाव चंद्रपूर तसेच चांदागढ असे होते. पुढे चांदा आणि १९६४ ला चंद्रपूर असे नाव झाले. पण चंद्रपूर सोबतच या शहराला लाडाने व प्रेमाने चांदा असे ही बरेच ठिकाणी म्हटले जाते.जिल्ह्याचे मुख्यालय, राजकीय घडामोडीचे केंद्र, मंत्र्यांचे शहर, औद्योगिक नगरी तसेच येथील महाकाली व अंचलेश्वर महादेव मंदिर असल्याने धार्मिक स्थळ तसेच जुन्या शहराभोवतीचे मजबूत परकोट आणि त्याला चार दिशांना चार मोठे दरवाजे असे चांदाचे वैशिष्टये आहे.बांदा हे शहर महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावरील कोकण भागातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. हे ऐतिहासिक शहर तेरखोल या नदीकाठी वसले आहे. पंधराव्या शतकात या शहराचे मोठे नाव होते. राजकीय घडामोडीच्या या शहराचे पूर्वी नाव होते आदिलाबाद! छत्रपती शिवाजी महाराजांनी तो भाग आदिलशहाकडून हिसकावला आणि आदिशहा हे नाव बदलवून बांदा असे नाव ठेवले. त्या भागात मराठी, मालवणी व कोकणी भाषा बोलली जाते. बंदेश्वर मंदिर व भूमिका मंदिर ही तेथील श्रद्धास्थान आहेत. तेथील किल्ल्याचा काही भाग ढासळला असला तरी इतिहासाच्या बरेचशा खाणाखुणा तेथे आहेत. चांदा आणि बांदा ही दोन्ही शहर परस्परविरूद्ध दिशेला व एकमेकापासून हजारो किलोमीटर लांब आहेत. राज्याच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत उल्लेख करण्याकरिता या दोन शहराचा ‘चांदा ते बांदा’असा उल्लेख केला जातो. एकंदरीत, चांदा ते बांदा ला या निमित्ताने मोठे नाव आणि महत्व मिळाले, आहे हे उल्लेखनीय!या दोन शहरांची निवड का?या दोन शहरांची नावे खूप छोटी, दोन अक्षरी आहेत आणि महत्त्वाचे म्हणजे त्यांची शेवटची अक्षरे यमकात छान जुडतात. ते उच्चारायला सोपी आणि ऐकायलाही छान वाटतात. आणि ही दोन्ही शहरे राज्याच्या टोकावर आहेत. त्यामुळे या शहरांची निवड केली असावी. कारण कोणतेही असो, या निमित्ताने या शहरांची नावे प्रसिध्द झाली आहेत. राजकारणी भाषणातून चांदा ते बांदा असे हमखास म्हणत असतात. महाराष्ट्र राज्यातील मागास जिल्ह्यातील विकासाकरिता राज्यशासनाने नुकतीच एक नवीन योजना सुरू केली आहे. या योजनेलाही ‘चांदा ते बांदा’ असे नाव देण्यात आले आहे.