शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपुरवठा कंत्राटदाराला पाठीशी घालण्याचा महापौरांचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 22:53 IST

शहरातील पाणी प्रश्नावर चर्चा करण्यासाठी बुधवारी महापालिकेच्या सभागृहात विशेष सभा बोलविण्यात आली होती. मात्र या सभेत महापौरांसह सर्व पदाधिकारी अनुपस्थित होते. यामुळे संतप्त विरोधी नगरसेवकांनी महापौर पाणी पुरवठा कंत्राटदाराला पाठिशी घालण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप करीत सभागृहाबाहेर येते निषेध व्यक्त केला.

ठळक मुद्देविशेष सभा : विरोधकांनी निषेध करून आंदोलनाचा दिला इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शहरातील पाणी प्रश्नावर चर्चा करण्यासाठी बुधवारी महापालिकेच्या सभागृहात विशेष सभा बोलविण्यात आली होती. मात्र या सभेत महापौरांसह सर्व पदाधिकारी अनुपस्थित होते. यामुळे संतप्त विरोधी नगरसेवकांनी महापौर पाणी पुरवठा कंत्राटदाराला पाठिशी घालण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप करीत सभागृहाबाहेर येते निषेध व्यक्त केला.यापूर्वी झालेल्या आमसभेमध्ये पाणीप्रश्नावर गदारोळ झाला होता. पाणीपुरवठा कंत्राटदार योगेश समरित व अमृतचे कंत्राटदार यांना सभागृहात पाचारण करून जाब विचारण्याचे मागील एका आमसभेमध्ये ठरविण्यात आले होते. यानंतर अमृतच्या कंत्राटदाराने सभागृहात हजेरी लावून सभागृहातील सदस्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. मात्र पाणीपुरवठा कंत्राटदार समरित वारंवार बोलावूनसुद्धा त्यांनी सभागृहात येण्याचे टाळले. यामुळे सभागृहाचा अवमान होत असल्याची बाब मागील आमसभेमध्ये सभागृहातील नगरसेवकांनी लक्षात आणून दिली. पाणीपुरवठा समस्येवर विशेष सभा घेण्याचे निश्चित केल्याशिवाय सभागृह चालू देणार नाही, अशी भूमिका मागील आमसभेमध्ये नगरसेवक पप्पू देशमुख यांनी घेतली होती. त्यानंतर आमसभेत १६ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता पाणी पाण्याच्या समस्येवर विशेष सभा घेण्याचे आश्वासन महापौर अंजली घोटेकर यांनी दिले होते. त्यानुसार आज बुधवारी पाणी समस्येवर विशेष सभेचे आयोजन केले असता महापौर अंजली घोटेकर, उपमहापौर अनिल फुलझेले, स्थायी समिती सभापती राहुल पावडे दुपारी १.४५ वाजेपर्यंत सभागृहात न पोहोचल्यामुळे विरोधकांचा तिळपापड झाला. त्यानंतर विरोधकांनी सभागृहातच निषेध करीत सभात्याग केला व सर्व विरोधक महानगरपालिका इमारतीसमोर एकत्रित झाले. या ठिकाणी नारेबाजी करीत सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आंदोलन पुकारण्याचा निर्धार केला.जेव्हा कंत्राटदार आले, तेव्हा महापौरच आल्या नाहीतपाणीपुरवठा कंत्राटदाराला बोलावल्यानंतरही त्याने सभागृहात येण्याचे टाळले. मात्र आजच्या सभेत कंत्राटदार योगेश समरित वेळेच्या आधी सभागृहामध्ये येऊन असताना व पाणीपुरवठ्यावर विशेष सभेबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता असताना ऐन वेळेवर महापौर, उपमहापौर व स्थायी समिती सभापती आले नाहीत. त्यामुळे सत्ताधारी पाण्याच्या समस्याबाबत गंभीर नसल्याचा आरोप विरोधकांनी केला. सत्ताधाºयांनी नागरिकांना वाºयावर सोडले. केवळ कंत्राटदाराचा बचाव करण्यासाठी पदाधिकारी अनुपस्थित राहिले, असा आरोप विरोधकांनी केला. यावेळी चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे शहर अध्यक्ष व नगरसेवक नंदू नागरकर, शहर विकास आघाडीचे गटनेते पप्पू देशमुख, नगरसेविका सुनिता लोढिया, नगरसेवक कुशल पुगलिया, नगरसेवक दीपक जयस्वाल, नगरसेविका मंगला आखरे, अशोक नागपुरे, सकीना अन्सारी, विना खनके, अमजद अली, मंगला भोयर, देवेंद्र बेले व पुष्पा मून उपस्थित होते.