शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

माथरा पाणी योजना ११ वर्षांपासून तहानलेलीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 05:00 IST

राजुरा तालुक्यातील माथरा येथे गावकऱ्यांना पाण्याची सोय व्हावी व नागरिकांच्या घरापर्यंत पाणी पोहोचावे यासाठी २००९ मध्ये पाण्याच्या टाकीचे बांधकाम करण्यात आले. आजघडीला तब्बल ११ वर्षांचा कालावधी उलटून गेला तरी शासनाच्या उदासीन धोरणामुळे पाणीपुरवठासारख्या नागरिकांचे भले करणाऱ्या योजनेची पाणीपुरवठा विभागाच्या बेजबाबदार अधिकाऱ्यांमुळे पार माती झाली आहे.

ठळक मुद्देपाणी मिळणार केव्हा? : पाण्याच्या टाकीचे बांधकाम रखडले

लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : माथरा येथील पाण्याच्या टाकीचे बांधकाम अपूर्ण असल्याने गेल्या ११ वर्षांपासून गावकऱ्यांना पाणी पुरवठा नळ योजनेच्या पाण्यापासून वंचित राहण्याची दुर्दैवी वेळ प्रशासनाने आणल्याने आता उन्हाळा सुरू झाल्यानंतरही गावकऱ्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे.राजुरा तालुक्यातील माथरा येथे गावकऱ्यांना पाण्याची सोय व्हावी व नागरिकांच्या घरापर्यंत पाणी पोहोचावे यासाठी २००९ मध्ये पाण्याच्या टाकीचे बांधकाम करण्यात आले. आजघडीला तब्बल ११ वर्षांचा कालावधी उलटून गेला तरी शासनाच्या उदासीन धोरणामुळे पाणीपुरवठासारख्या नागरिकांचे भले करणाऱ्या योजनेची पाणीपुरवठा विभागाच्या बेजबाबदार अधिकाऱ्यांमुळे पार माती झाली आहे. मध्यंतरी पाणीपुरवठा नळ योजनेच्या टाकीचे स्विचरूम विषयी गावकऱ्यात चांगलाच वाद चिघळला होता. मात्र मध्यस्थीनंतर वादावर पडदा पडला. माथरावासीयांना लवकर पाणी मिळावे, यासाठी गावामध्ये नळ योजनेची भूमिगत पाईप लाईन टाकण्यात आली.आता आपल्या घरापर्यंत पाणी पुरवठा नळ योजनेचे पाणी पोहचेल म्हणून गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. मात्र या पाणी पुरवठा नळ योजनेला अल्पावधीतच ग्रहण लागल्याने गावकऱ्यांच्या भल्यासाठी राबविलेली चांगली योजना शासनाच्या बेजबाबदार अधिकाºयांच्या दुर्लक्षित धोरणामुळे कुचकामी ठरली. उन्हाळ्याचे दिवस असताना नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. आजघडीला मुख्य रस्त्यालगत उभ्या असलेल्या या टाकीचे बांधकाम अपूर्ण अवस्थेत आहे. ग्रापंचायत व पाणीपुरवठा समितीच्या देखरेखीखाली पाणीपुरवठा नळ योजनेचे काम सुरू होते. मात्र ग्रामपंचायत प्रशासनाने पाणी पुरवठा योजनेचे हे काम राजुरा येथील पाणीपुरवठा विभागाकडे हस्तांतरित केले आहे. त्यामुळे पाणीपुरवठा विभागाने टाकीचे अपूर्ण अवस्थेत असलेले बांधकाम पूर्ण करून माथरावासीयांची तहान भागवावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.पाण्यासाठी नागरिकांचा संघर्ष सुरूचसध्या उन्हाळ्याचे दिवस आहे. पाण्यासाठी जिवाची लाहीलाही होत असतानाच माथरावासीयांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. गावातील हातपंपावर पाणी भरण्यासाठी महिला गर्दी करीत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून गावकऱ्यांचा पाण्यासाठी संघर्ष सुरूच आहे.माथरा येथे ११ वर्षांपूर्वी पाणी पुरवठा योजनेच्या टाकीचे बांधकाम करण्यात आले. मात्र अल्पावधीतच या पाणीपुरवठा योजनेला ग्रहण लागले. ग्रामपंचायतीने सबंधित विभागाकडे टाकीचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी अनेकदा पाठपुरावा केला. मात्र अजूनही टाकीचे बांधकाम अपूर्ण असून तातडीने टाकीचे बांधकाम पूर्ण करावे.- लहुजी चहारे, सरपंच, माथरा.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई