शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

वसतिगृहांना पुरविलेले साहित्य निकृष्ट दर्जाचे

By admin | Updated: August 17, 2015 00:38 IST

गेल्या वर्षभऱ्यापासून अनुदान रखडल्याने मागासवर्गीय अनुदानित वसतिगृहातील विद्यार्थ्यांचे हाल सुरू आहेत.

परिपोषणासाठी निधीच नाही: कंत्राटदाराचे हित साधण्याचा प्रयत्नचंद्रपूर : गेल्या वर्षभऱ्यापासून अनुदान रखडल्याने मागासवर्गीय अनुदानित वसतिगृहातील विद्यार्थ्यांचे हाल सुरू आहेत. शासनाकडून सोयी-सुविधांच्या नावाखाली या वसतिगृहांना अनेक वस्तू पुरविण्यात आल्या आहेत. मात्र त्या अतिशय निकृष्ठ दर्जाच्या असून वापरण्यायोग्य नसल्याचा आरोप संस्थाचालकांनी केला आहे. विद्यार्थ्यांच्या परिपोषणासाठी हात राखून निधी दिला जात असताना दुसरीकडे निव्वळ कंत्राटदाराचे पोट भरण्यासाठी वसतिगृहांना साहित्य पुरवठा केला जात असल्याचेही संस्था चालकांचे म्हणणे आहे. शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष विभागाच्यावतीने या मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी खासगी संस्थांच्या मार्फत वसतीगृहे चालविली जातात. चंद्रपूर जिल्ह्यात अशी ६८ वसतीगृहे आहेत. त्यात ग्रामीण भागातील तीन हजारावर विद्यार्थी राहून शिक्षण घेत आहेत. या वसतिगृहांना शासनाकडून एकीकडे अतिशय तोकडे अनुदान दिले जात असताना दुसरीकडे हे अनुदान नियमित दिले जात नसल्याने संस्थाचालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सामाजिक न्याय विभागाकडून चंद्रपूर जिल्ह्यातील मागासवर्गीय अनुदानित वसतिगृहांना दरवर्षी साडेतीन ते चार कोटी रुपये निधीची आवश्यकता असते. पण शासनाने सन २०१३-१४ या वर्षासाठी केवळ दोन कोटी २८ लाख रुपयांचा निधी दिला, तर २०१४-१५ या वर्षासाठी दोन कोटी ४३ लाख रुपयांचे अनुदान दिले. वसतिगृह अनुदान व कर्मचाऱ्यांचे मानधन यासाठी चार कोटी रुपये खर्च आहे. त्यामुळे संस्था चालकांना वसतिगृह चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे. वारंवार विनंत्या करून, संबधित मंत्र्यांना भेटूनही अनुदानाचा निधी देण्यासाठी टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप संस्था चालकांनी केला आहे. या निकृष्ठ साहित्य पुरवठ्याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)