शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

७१ जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 23:20 IST

सनई- चौघड्याचे सूर, वऱ्हाड्यांची रेलचेल, फुलांनी सजविलेल्या बसेसमधून लग्नमंडपात आलेले तब्बल ७१ जोडपे, फुलांच्या वर्षावाने त्यांचे झालेले स्वागत, पंचपक्वांनाचे जेवन आणि विविध धर्माच्या रितीरिवाजानुसार एकाच मंडपात पार पडलेला आगळावेगळा विवाह सोहळा शनिवारी चंद्रपूरच्या चांदा क्लब ग्राऊंडवर पार पडला.

ठळक मुद्देअनुकरणीय उपक्रम : धर्मदाय आयुक्त कार्यालयाचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: सनई- चौघड्याचे सूर, वऱ्हाड्यांची रेलचेल, फुलांनी सजविलेल्या बसेसमधून लग्नमंडपात आलेले तब्बल ७१ जोडपे, फुलांच्या वर्षावाने त्यांचे झालेले स्वागत, पंचपक्वांनाचे जेवन आणि विविध धर्माच्या रितीरिवाजानुसार एकाच मंडपात पार पडलेला आगळावेगळा विवाह सोहळा शनिवारी चंद्रपूरच्या चांदा क्लब ग्राऊंडवर पार पडला. या सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन धर्मदाय आयुक्त कार्यालयाच्या पुढाकारातून करण्यात आले.राज्याचे धर्मदाय आयुक्त शिवकुमार डिगे यांच्या पुढाकारातून राज्यभरात पहिल्यांदाच जिल्ह्यातील सहायक धर्मदाय आयुक्त कार्यालयाच्या वतीने सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला. गरीब, आत्महत्याग्रस्त शेतकरी, सर्वसामान्य कुटुंबातील मुला-मुलींचे विवाह नि:शुल्क व्हावे आणि त्यांचा खर्च वाचावा, या मागील उदात्त हेतू आहे. विवाह सोहळ्याच्या खर्चाची जबाबदारी जिल्ह्यातील विविध धार्मिक, सामाजिक संघटनांनी उचलावी, यासाठी धर्मदाय कार्यालयाने पुढाकार घेतला.दरम्यान, धर्मदाय कार्यालयाच्या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्यातील विविध धार्मिक, सामाजिक आणि शैक्षणिक संघटनांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत या विवाह सोहळ्यात सहभाग घेतला होता. यासाठी आयोजन समिती तयार करण्यात आली. या आयोजन समितीने केलेल्या प्रयत्नातून तब्बल सर्वधर्मातील ७१ जोडप्यांचा या मंडपात विविध धर्माच्या रितीरिवाजानुसार विवाह लावून देण्यात आला. यासाठी विविध धर्माचे धर्मगुरु उपस्थित होते. यावेळी विवाहित जोडप्यांना विविध भेटवस्तू देण्यात आले. डिजेला तिलांजली देत सनई, चौघड्याच्या सुरात हा विवाह सोहळा पार पडला. तत्पूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातून नवरदेव, नवरीची फुलांनी सजविलेल्या बसमधून वरात लग्नमंडपापर्यंत आणण्यात आली आणि शांततेत विवाह सोहळा पार पडला. वºहाड्यांच्या जेवनाची संपूर्ण जबाबदारी सकल जैन समाज संघटनेने घेतली होती.विवाह सोहळ्याला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश नितीन बोरकर, सहायक धर्मदाय आयुक्त रामलाल चव्हाण, धर्मदाय आयुक्त कार्यालयाच्या अधीक्षक रॉय, आयोजन समितीचे अध्यक्ष मनीष महाराज, उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. अशोक जीवतोडे, सचिव संजयकुमार पेचे, महेश कल्लुरवार, सुधाकर कुंदोजवार, शोभाताई पोटदुखे, सूर्यकांत खनके आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.