शहरं
Join us  
Trending Stories
1
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
3
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
4
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
5
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
6
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
7
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
8
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
9
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
10
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
11
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
12
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
13
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
14
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
15
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
16
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
17
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
18
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
19
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट

विवाह एकीशी व पलायन दुसरीसोबत

By admin | Updated: May 9, 2015 01:09 IST

तालुक्यातील जुगनाळा येथील नितीन शालिकराम ठाकरे (२५) युवकाने एका महिन्यापूर्वी रितीपरंपरेनुसार लग्न केले.

ब्रह्मपुरी : तालुक्यातील जुगनाळा येथील नितीन शालिकराम ठाकरे (२५) युवकाने एका महिन्यापूर्वी रितीपरंपरेनुसार लग्न केले. परंतु, त्याने विवाहित पत्नीला सोडून एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये नोंदविण्यात आली. त्यानुसार नितीन ठाकरे रा. जुगनाळा याला अटक करण्यात आली आहे.प्राप्त माहितीनुसार अल्पवयीन मुलीशी लग्नाअगोदर प्रेमसंबंध होते. परंतु घरच्याच्या आग्रहाखातर मुलाने रितीरिवाजानुसार एक महिन्यापूर्वी लग्न केला. तर दुसरी अल्पवयीन मुलगी माहेर (खरबी) येथे लग्नाला गेली असता, आरोपी नितीन तेथे गेला व तिला फूस लावून पळवून नेले. सदर अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी या घटनेची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये केली असता, आरोपी हा पुण्याला असल्याचे पोलिसांना माहिती मिळाली. ब्रह्मपुरी पोलीस पुणे येथे जाऊन दोघांनाही ताब्यात घेतले व आरोपी नितीनला अटक केली. अल्पवयीन मुलीला बालसुधारगृहात रवानगी करण्यात आल्याची माहिती आहे. आरोपी नितीनचे एक महिन्यापूर्वी विवाह एकीशी व एक महिन्यानंतर पलायन दुसरीशी केल्याने गावात चर्चेचा विषय बनलेला आहे. या प्रकरणाचा तपास ठाणेदार किशोर नगराळे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला उपनिरीक्षक राऊत करीत आहेत. (प्रतिनिधी)