शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
2
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
3
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
4
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
5
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
6
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
7
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'
8
NSE चा IPO कधी येणार? सेबीचे अध्यक्ष म्हणाले, "आयपीओ आणण्यात कोणताही अडथळा..."
9
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
10
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
11
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
12
८ वर्षांपूर्वी आई गेली, नुकतेच बाबाही गेले; रीमा लागूंच्या वाढदिवसानिमित्त लेकीची भावुक पोस्ट
13
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
14
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
15
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
16
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
17
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
18
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
19
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
20
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 

मराठा लॉन्सर संघ ठरला ‘खासदार चषक’चा मानकरी

By admin | Updated: December 2, 2015 00:55 IST

महाराष्ट्र हे खेळांचे माहेरघर असून कुस्ती व कबड्डी या खेळात राज्याचा नेहमीच अग्रक्रम राहिला आहे.

विदर्भस्तरीय कबड्डी स्पर्धेचा समारोप : देशी खेळ हा प्रत्येकाच्या आकर्षणाचा विषय : हंसराज अहीरचंद्रपूर : महाराष्ट्र हे खेळांचे माहेरघर असून कुस्ती व कबड्डी या खेळात राज्याचा नेहमीच अग्रक्रम राहिला आहे. या दोन्ही क्रीडा प्रकारातील खेळाडूंनी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत मजल मारली आहे. नावलौकीक संपादन केला आहे. देशी खेळ हा प्रत्येकांच्या आकर्षणाचा विषय राहिला असून कबड्डीबाबत लोकांमध्ये विशेष आवड दिसते. चंद्रपुरातील मैदानावर आजवर अनेक सामने आयोजित केले व ते सातत्याने आयोजित केले जात आहेत. कालिदास अहीर स्मृतिप्रीत्यर्थ ‘खासदार चषक’ विदर्भस्तरीय पुरुषांच्या कबड्डी सामन्यांचे आयोजन हे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा सन्मान व सत्कार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय रसायन व उर्वरक राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले. ते विदर्भस्तरीय कबड्डी स्पर्धेचा समारोप व बक्षिस वितरण कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते. रविवारी स्थानिक डॉ. रविंद्रनाथ टागोर प्राथमिक शाळेच्या प्रांगणात पार पडलेल्या समारोपीय कार्यक्रमाला सन्मित्र मंडळाचे अध्यक्ष डॉ. बबनराव अंदनकर, महापौर राखी कंचर्लावार, भाजप नेते चंदनसिंह चंदेल, भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष विजय राऊत, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवाण, वासुदेव कोतपल्लीवार, दिलीप कपूर, हरिश्चंद्र अहीर, उपमहापौर वसंत देशमुख, अनिल फुलझेले, शंकर वाकोडे, मन्ना महाराज त्रिवेदी, दिलीप रामेडवार, डॉ.एम.जे. खान, राहुल सराफ, सुभाष कासनगोट्टूवार, मधुसूंदन रुंगठा, बंडू लडके, वेकोलिचे क्षेत्रिय महाप्रबंधक मिश्रा, अशोक मोरे, धनंजय हुड, अंजली घोटेकर, मोहन चौधरी, रघुविर अहीर, शामल अहीर, विनय अहीर, महेश अहीर, चंदन अहीर, राजू घरोटे, रवि गुरनुले, सुषमा नागोसे, माया उईके यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.स्पर्धेत मराठा लान्सर नागपूरचा संघ ‘खासदार चषक’चा मानकरी ठरला. तर उपविजेता संघ म्हणून जयहिंद क्रीडा मंडळ यवतमाळ यांना पुरस्काराने ना. अहीर व अन्य मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. तृतीय पुरस्कार समर्थ क्रीडा मंडळ अमरावती व जयभारत क्रीडा मंडळ बल्लारपूर यांना चषक देवून सन्मानित करण्यात आले. यावेळी कबड्डी खेळातील चंद्रपूरचे आंतरराष्ट्रीय खेळाडू अनिल माळवे व राष्ट्रीय खेळाडू सुनील वानखेडे, लक्ष्मण पवार, कैलास राठोड, वसंता देवटकले, रामू पवार, सरिता नैनवार यांचा ना. अहीर व अन्य मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.स्पर्धेच्या यशस्वीतेकरिता सन्मित्र मंडळाचे व सत्शिल बहुउद्देशिय मंडळाचे पदाधिकारी धनंजय हुड, अनंता ठाकरे, विनोद शेरकी, अमित लडके, रविंद्र शेरकी, प्रमोद डाखोरे, संभा खेवले, मोहन चौधरी, किशोर कुडे, सचिन ठाकरे, मनोज शेरकी, महेंद्र व्याहाडकर, भरत रोहणे, दीपक लडके, प्रमोद डंबारे, बापु शेरकी, तेजस काळे, समीर चापले, श्याम चापले, संतोष दंडेवार, चेतन शिवणकर, राजकुमार चौधरी, राहुल गायकवाड, सुहास बनकर, निलेश माळवे, आशीष चहारे आदींनी सहकार्य केले. संचालन मोंटू सिंह व अंजली घोटेकर यांनी केले आभार विनोद काळे यांनी मानले. (स्थानिक प्रतिनिधी)