कोरपना : तालुक्यातील अनेक गावांतील पाणंद रस्ते स्वातंत्र्याच्या अनेक दशकांनंतरही रखडलेले आहेत. त्यामुळे पावसाळ्यात शेतकऱ्यांना चिखल तुडवतच शेतात जावे लागत आहे. या रस्त्याची त्वरित सुधारणा करण्यात यावी, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांकडून होत आहे.
कोरपना - कन्हाळगाव , गांधिनगर - आंबेझरी, दुर्गाडी - पवनार, खैरगाव - कोरपना, बोरगाव - कुकुडबोडी, कुसळ - पिपर्डा, देवघाट - कुसळ, बेलगाव - चिंचोली, घाटराई - सावलहिरा, जांभूळधरा - चोपन, गोविंदपूर - कोठोडा, कुसळ - कोरपना, मांडवा - चोपन, तुलसी - जेवरा, भोईगुडा- जेवरा, पारडी - अकोला, नारंडा - पिपरी, शेरज बु. - पिपरी, कोडशी - पिपरी, नारंडा - बोरी नवेगाव, तलोधी - खरगाव, अंतरगाव - संगोडा, धोपटाळा - शेरज, पारधीगुडा - जेवरा, आदी पाणंद रस्त्याची दुरुस्ती होणे गरजेचे आहे. मात्र, याकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे.