शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

मनपात अधिकार नसलेला अधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 22:46 IST

चंद्रपूर महानगर पालिका सध्या विविध कारणांनी चर्चेत आहे. या महानगर पालिकेतील एक वरिष्ठ अधिकारी अधिकाराविनाच असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. यावरून मनपाचा आणखी एक भोंगळ कारभार पुढे आला आहे.

ठळक मुद्देमनपाचा कारभार : जाणीवपूर्वक अधिकार डावलल्याची चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर महानगर पालिका सध्या विविध कारणांनी चर्चेत आहे. या महानगर पालिकेतील एक वरिष्ठ अधिकारी अधिकाराविनाच असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. यावरून मनपाचा आणखी एक भोंगळ कारभार पुढे आला आहे.प्राप्त माहितीनुसार, महानगर पालिकेत उपायुक्त हे आयुक्तानंतरचे दुसरे महत्त्वाचे पद आहे. मात्र या पदाच्या अधिकाऱ्याकडे असलेले सर्व अधिकार महानगर पालिका प्रशासनाने काढून टाकले आहेत. याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. विजय देवळीकर हे महानगर पालिकेचे उपायुक्त आहे. त्यांच्याकडे आता कोणताही अधिकार नाही. ते दररोज कार्यालयात येतात. आपल्या खुर्चीवर दिवसभर बसून राहतात आणि कार्यालयाची वेळ झाल्यानंतर घरी जातात, अशी माहिती मनपाच्या सूत्राने दिली.अधिक माहिती घेतली असता विजय देवळीकर यांची काही दिवसांपूर्वी गडचिरोली जिल्ह्यातील कोरची नगरपंचायत येथे मुख्याधिकारी म्हणून बदली करण्यात आली होती. अल्पकाळात बदली झाल्याने त्यांनी मॅटमध्ये धाव घेतली. यामध्ये मॅटचा निकाल त्यांच्या बाजुने लागला. त्याची बदली रद्द करण्यात आली. त्यानंतर ते पुन्हा चंद्रपूर महानगर पालिकेत उपायुक्त म्हणून कर्तव्य बजावण्यासाठी रूजू झाले.मात्र तेव्हापासून त्यांच्याकडे असलेले सर्व अधिकार काढून टाकण्यात आले आहे. एखाद्या बड्या अधिकाºयाचे अधिकार का काढून घेण्यात आले, याबाबत महानगर पालिकेतील अधिकारी अनभिज्ञ आहे. हे कृत्य जाणिवपूर्वक केल्याचीही चर्चा आता मनपात ऐकायला मिळत आहे.