शहरं
Join us  
Trending Stories
1
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
2
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
3
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
4
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
5
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
6
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
7
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
8
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
9
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
10
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
11
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
12
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
13
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
14
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
15
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
16
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
17
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
18
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
19
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
20
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."

देशमुखगुड्यात मलेरियाने विद्यार्थिनीचा मृत्यू

By admin | Updated: August 19, 2015 01:21 IST

तालुक्यात सध्या आठवडाभरापासून मलेरिया आजाराने थैमान घातले आहे. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी आरोग्य यंत्रणा पूर्णत: कुचकामी ठरली आहे.

जिवती: तालुक्यात सध्या आठवडाभरापासून मलेरिया आजाराने थैमान घातले आहे. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी आरोग्य यंत्रणा पूर्णत: कुचकामी ठरली आहे. तालुक्यापासून १२ किमी अंतरावर असलेल्या देशमुखगुडा येथील अंजना शिवशंकर दुधभाते (१३) या विद्यार्थीनीचा मलेरियाने मृत्यू झाल्याने परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. ही मुलगी हिमायतनगर जिल्हा परिषद शाळेतील सातव्या वर्गाची विद्यार्थिनी होती.जिवती प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत नगराळा, जोळणघाट, मांगगुडा, तर पाटण प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गत कोलांडी, टिटवी, खडकी, रायपूर, आंबेझरी, नंदप्पा या गावात मलेरियाची साथ सुरू झाली आहे. तालुक्यात दोनच प्राथमिक आरोग्य केंद्र असून येथेही डॉक्टर किंवा कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे रुग्णांची गैरसोय होत आहे. यामुळे तालुक्यातील अनेक रुग्ण गडचांदूर राजुरा तसेच चंद्रपूरला उपचारासाठी जात आहेत. पावसाळा सुरु होऊन दोन महिने लोटले. मात्र अनेक गावात फवारणी झाली नाही. यामुळे हिवतापाला आमंत्रण देणाऱ्या डासांचे प्रमाण वाढले आहे. ज्या देशमुखगुड्यात हिवतापाने अंजना मृत पावली, तेथे विहिरीत ब्लिचिंग पावडर टाकण्यात येत नाही. तसेच येथील पाण्याची चाचणीसुद्धा करण्यात आली नाही.(शहर प्रतिनिधी)सेवा देण्यास आरोग्य यंत्रणा अपयशीतालुक्यात जिवती आणि पाटण येथे प्राथमिक आरोग्य केंद्र असून याकेंद्रातंर्गत पुडियाल मोहदा, नगराळा, नोकेवाडा, लांबोरी, भारी, शेणगाव, नंदप्पा, हिरापूर आणि पुनागुडा येथे उपकेंद्र आहेत. परंतु याठिकाणी कर्मचारी वेळोवेळी उपस्थित न राहिल्याने रुग्णांची हेळसांड होत आहे. गावागावांत जाऊन कर्मचाऱ्यांनी भेटी द्यायला पाहिजे. पण असे होत नसल्याने आरोग्य विभाग अपयशी ठरत आहे. जिवती तालुका अनेक गावे आहेत. मात्र या तालुक्यात ग्रामीण रुग्णालयाची सोय झाली नाही.तालुक्याला आता ग्रामीण रुग्णालय शासनाने मंजूर केले आहे पण ते सुरु होणार कधी? असा नागरिकांचा प्रश्न आहे.