शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

कोरपन्यात स्टेडियमसाठी निधी उपलब्ध करून देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 23:18 IST

प्रत्येक समस्येवर रामबाण उपाय म्हणजे दृढसंकल्प. दृढसंकल्पासाठी शिक्षण अतिशय महत्त्वाचे आहे. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, असे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले आहे.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : दृढसंकल्प हाच समस्येवर प्रभावी उपाय

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : प्रत्येक समस्येवर रामबाण उपाय म्हणजे दृढसंकल्प. दृढसंकल्पासाठी शिक्षण अतिशय महत्त्वाचे आहे. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, असे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले आहे. त्या महामानवाच्या प्रतिमेला वंदन करताना त्यांच्या आदर्शावर एक पाऊल पुढे जाण्याचा संकल्प करण्याची आज आवश्यकता आहे. युपीएससी, एमपीएससी तसेच अन्य स्पर्धा परिक्षांमध्ये या जिल्हयातील विद्यार्थी यशस्वी ठरावे, यासाठी आपण मिशन सेवा हाती घेतले आहे. स्टुडंट फोरम ग्रुपने यासंदर्भात घेतलेला पुढाकार अभिनंदनीय असल्याचे कौतुकोद्गार अर्थमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.आमदार अ‍ॅड. संजय धोटे यांनी केलेल्या मागणीनुसार कोरपना येथील स्टेडियमचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी निधी उपलब्ध करण्याची घोषणाही यावेळी ना. मुनगंटीवार यांनी केली.कोरपना येथे स्टुडंट फोरम ग्रुपद्वारा सोमवारी आयोजित महात्मा फुले शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षा कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळयात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी आमदार अ‍ॅड. संजय धोटे, बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरीश शर्मा, कांता भगत, विजयालक्ष्मी धोटे, दिलीप झाडे, वैभव ठाकरे, उपेंद्र मालेकर प्रामुख्याने उपस्थित होते. कोरपना, जिवतीच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून दिला असल्याचे सांगत ना. मुनगंटीवार पुढे म्हणाले, जिवतीसाठी ७ कोटी रुपये निधी, कोरपना पंचायत समितीच्या फर्निचरसाठी १ कोटी रू. निधी, कोरपना शहराच्या विकासासाठी २ कोटी रू. निधी, राजुऱ्यासाठी ४ कोटी रू., गडचांदूर येथे बसस्थानक यासह राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम या परिसरात होऊ घातले आहे. या परिसरात आमदा अ‍ॅड. धोटे यांच्या मागणीनुसार विमानतळाचे बांधकाम सुध्दा लवकरच सुरू होईल. कापसावर प्रक्रिया करणारे उद्योग उभारण्याचा आमचा मानस आहे. कोरपना येथील विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिकेची मागणी करण्यात आली आहे. आपण जागा उपलब्ध करून द्या आम्ही अभ्यासिका बांधून देवू व त्या माध्यमातून स्पर्धा परीक्षांसाठी तयारीसाठी आवश्यक पुस्तके मोफत उपलब्ध करून देऊ असेही ते म्हणाले. राजुरा विधानसभा क्षेत्राच्या विकासासाठी ना. मुनगंटीवार यांनी मोठ्या प्रमाणावर निधी दिला, अशी माहिती आमदार अ‍ॅड. धोटे यांनी दिली.