शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
3
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
4
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
5
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
6
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
7
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
8
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
9
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
10
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
11
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
12
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
13
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
14
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
15
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
16
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

राष्ट्रसंतांची आदर्श गाव संकल्पना साकारण्यासाठी अंत:करणापासून प्रयत्न करावे

By admin | Updated: October 19, 2015 01:30 IST

आदर्श गाव ही संकल्पना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी प्रथमत: मांडली. त्यांच्या ग्रामगीतेतून त्यांनी याबाबतचा संदेश जनतेला दिला.

सुधीर मुनगंटीवार : मार्गदर्शन कार्यशाळेत केले आवाहन चंद्र्रपूर : आदर्श गाव ही संकल्पना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी प्रथमत: मांडली. त्यांच्या ग्रामगीतेतून त्यांनी याबाबतचा संदेश जनतेला दिला. आदर्श ग्राम गाव योजनेंतर्गत चंद्र्रपूर जिल्ह्यातील निवडण्यात आलेली २७ गावे पहिल्या टप्प्यात आदर्श करण्याचा आपण सर्वशक्तिनिशी प्रयत्न करू. जलयुक्त शिवार योजना, मनरेगा यासारखी कामे मोठया प्रमाणात लोकसहभागातून केली जाऊ शकतात. प्रत्येक कामासाठी निधी आवश्यकच आहे असे नाही. संस्कार व इतर कामे हे निधीशिवाय गावात होऊ शकतात. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची आदर्श गाव संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी अंत:करणापासून आपण सर्वांनी प्रयत्न करावे, असे आवाहन वित्त, नियोजन व वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शनिवारी जिल्हा परिषदेच्या सभागृहात आयोजित केलेल्या सरपंच, उपसरपंच व सचिव यांच्या आदर्श ग्राम मार्गदर्शन कार्यशाळेत बोलताना केले.यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा कल्पना बोरकर, शिक्षण सभापती देवराव भोंगळे, महिला व बालकल्याण सभापती सरिता कुडे, हरीश शर्मा, भास्कर थेरे पाटील, यशदाचे संचालक सुमेध गुर्जर, साधनव्यक्ती रामलाल काळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश राठोड, जिल्हा परिषद सदस्य ब्रिजभुषण पाझारे, अल्का लोणकर व उपमुख्यकार्यकारी अधिकारी मोहिते आदींची प्रामुख्?याने उपस्थित होते.कार्यशाळेत बोलताना मुनगंटीवार पुढे म्हणाले, चंद्रपूर जिल्ह्यात आदर्श गाव योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यातील २७ गावांशी संबंधित सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवक यांच्यासाठी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. पेयजल तसेच शेतीसाठी पाणी या दृष्टीने गावे स्वयंपूर्ण व्हावीत, यासाठी जलयुक्त शिवार योजनेची अंमलबजावणी गावागावांत प्रभावीपणे राबविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे आहे. गावाचा भौतिक, आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक तसेच मानसिक विकास करण्याच्या दृष्टीने सुक्ष्म नियोजन करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. या माध्यमातूनच आदर्श गाव योजना प्रभावीपणे राबविली जाईल, असेही ते म्हणाले. चंद्रपूर जिल्हयातील पहिल्या टप्प्यातील २७ गावे हे राज्यातील इतर जिल्हयांसाठी मार्गदर्शक ठरावी, यादृष्टीने आपण सर्वांनी कठोर परिश्रम घ्यावे, असेही ना. मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले. (प्रतिनिधी)