शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

क्रांतीनगरीतील मुख्य मार्ग घेणार मोकळा श्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 00:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : चिमूर शहरात गेल्या अनेक वर्षांपासून मुख्य मार्गावर आठवडी बाजार भरविला जात आहे. त्यामुळे दुचाकी, चारचाकी, मोठे वाहन तसेच बाजारात येणाऱ्या अथवा रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.चिमूर-वरोरा मुख्य मार्गावर भरणारा आठवडी बाजार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मोकळ्या जागेत भरविण्याविषयी नगर परिषदेत ठराव घेण्यात आला. ...

ठळक मुद्देपालिकेचा करार : कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात भरणार आठवडी बाजार

लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : चिमूर शहरात गेल्या अनेक वर्षांपासून मुख्य मार्गावर आठवडी बाजार भरविला जात आहे. त्यामुळे दुचाकी, चारचाकी, मोठे वाहन तसेच बाजारात येणाऱ्या अथवा रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.चिमूर-वरोरा मुख्य मार्गावर भरणारा आठवडी बाजार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मोकळ्या जागेत भरविण्याविषयी नगर परिषदेत ठराव घेण्यात आला. त्यावर बाजार समितीने सहमती दर्शवली. पालिकेच्या मासिक सभेत काही अटी शर्तीसह बाजार भरविण्यास सहमती दर्शविण्यात आल्याने शहरातील मुख्य रस्ता आता मोकळा श्वास घेणार आहे.चिमूर नगर परिषद स्थापन होण्यापुर्वीपासून आठवडी बाजार मुख्य रस्त्यावर भरत आहे. ग्रामपंचायत काळात बाजार तलावात भरविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र उन्हाळ्यात धूळ आणि पावसाळ्यात चिखल यामुळे पुन्हा बाजार मुख्य रस्त्यावरच भरविण्यात आला. यामुळे रहदारीस होणाºया अडथळ्यामुळे तसेच नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता पालिकेने सर्वसाधारण सभेत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मोकळ्या जागेत बाजार भविण्याविषयी एक मताने ठराव पारित केला. हा ठराव कृषी उत्पन्न बाजार समितीला देण्यात आला. बाजार समितीनेही अनुकुलता दर्शवली व तसे पत्र पालिकेला दिले. या पत्रावर १० एप्रिलला झालेल्या मासिक सभेत चर्चा करून करार करण्याचे ठरविण्यात आले. त्यामुळे मुख्य रस्ता मोकळा श्वास घेणार आहे.फुटपाथवरील अतिक्रमण हटविण्याची मागणीचिमूर शहराचे नागरिकीकरण झाले असून लोकसंख्येतही मोठी वाढ झाली आहे. यामुळे शहरात वाहतुकीची कोंडी निर्माण होवू नये म्हणून मुख्य रस्त्याला चौपदरी करण्यात येवून फुटपाथ व नालीचे बांधकाम करण्यात आले आहे. मात्र फुटपाथवर अतिक्रमण वाढल्याने सदर अतिक्रमण हटविण्याची मागणी आहे.या आहेत अटी व शर्तीसभेतील निर्णयाप्रमाणे उपलब्ध केलेल्या जागेसाठी भाडे तत्वावर दरमहा ३० हजार रुपये द्यावे, मूत्रिघर, वीज, पिण्याचे पाणी व स्वच्छतेची जबाबदारी नगर परिषदेची राहील, समितीने बाजाराकरिता जागा समतल करून द्यावे, किमान दोन वर्षांचा करार करण्यात येईल, मात्र भाडे दरमहा देण्यात येईल, समितीने तयार करून दिलेल्या खड्यातच कचºयाची विल्हेवाट लावली जावी. बाजाराचा कर नगर परिषदेने ठरविलेला ठेकेदारच वसूल करेल, या अटींचा समावेश करारात आहे.